India vs Australia | 4th Test | India PM Mr. Narendra Modi and Australia PM Mr. Anthony Albanese Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत नाणेफेक! 'अशी' आहे दोन्ही संघांची Playing XI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटीला अहमदाबादमध्ये गुरुवारी सुरुवात झाली असून यावेळी दोन्ही देशांचे पंतप्रधान उपस्थितीत होते.

Pranali Kodre

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु झाला. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या उपस्थित सुरुवात झाली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीपूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांची पंतप्रधांनांनी भेट घेतली. त्यानंतर मोदी आणि अल्बानीज यांनी मैदानाला गोल फेरी मारली. यानंतर ही नाणेफेक पार पडली.

भारतीय संघात एक बदल

या सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. भारतीय संघव्यवस्थापनाने या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला विश्रांती दिली आहे. त्यामुळे मोहम्मद शमीने प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. या एका बदला व्यतिरिक्त भारताने कोणताही बदल केलेला नाही.

तसेच ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयी प्लेइंग इलेव्हनच या सामन्यासाठीही कायम करण्यात केली आहे. त्यामुळे इंदूर कसोटी खेळलेला ऑस्ट्रेलिया संघच या सामन्यातही खेळताना दिसेल.

दोन्ही संघांसाठी चौथा सामना महत्त्वपूर्ण

हा कसोटी सामना मालिका निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिकेत पराभव टाळण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक असेल. तर भारतीय संघ सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला, तरी ही मालिका भारतीय संघ जिंकेल.

पण कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय गरजेचाच आहे.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव

ऑस्ट्रेलिया संघ - ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT