India vs Australia | World Cup Final PTI
क्रीडा

World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी सज्ज! कसे असेल हवामान अन् खेळपट्टी?

India vs Australia Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या अंतिम सामन्यावेळी कसे वातावरण असेल आणि खेळपट्टी कशी असेल, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia ICC ODI Cricket World Cup 2023 Final, Pitch and Weather Update:

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 20 वर्षांनी वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत.

उल्लेखनीय गोष्ट अशी ती वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी त्यांचा पहिला सामनाही एकमेकांविरुद्धच खेळला होता, ज्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. दरम्यान, आता या दोन संघात अंतिम सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान अहमदाबादमधील वातावरण कसे असणार आहे, यावर एक नजर टाकू.

अहमदाबादमध्ये accuweather च्या रिपोर्टनुसार रविवारी दिवसा साधारण 33 डिग्री सेल्सियस तापमान असेल, तर रात्री जवळपास 20 डिग्री सेल्सियस तापमान असणार आहे. तसेच पावसाची शक्यता नाही. त्यामुळे या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. दरम्यान, वातावरणात उष्णता आणि दमटपणा असल्याने खेळाडूंना क्रॅम्प येण्याचा त्रास होऊ शकतो.

कशी असेल खेळपट्टी?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा झाली आहे. दरम्यान, दोन्ही संघांच्या कर्णधारांनीही यावर सामन्याच्या पूर्वसंध्येला चर्चा केली आहे. रोहितने दिलेल्या माहितीनुसार खेळपट्टी धीम्यागतीची असेल, तसेच त्यावर थोडे गवतही असल्याचे त्याने सांगितले.

त्याचबरोबर कमिन्सने दिलेल्या माहितीनुसार खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असणार आहे. तसेच त्याने असेही संकेत दिले की भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक फार महत्त्वाची ठरणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

अनेक रिपोर्ट्सनुसार अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी काळ्या मातीची असणार आहे, तसेच त्यावर बरेच रोलिंग करण्यात आले आहे, ज्यामुळे ती धीम्यागतीची बनेल. तसेच खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT