Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja Video: दुखापत, शस्त्रक्रिया आणि आता कमबॅक, कसे होते 5 महिने? स्वत: जड्डूची कबुली

Pranali Kodre

Ravindra Jadeja: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतून भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा पुनरागमन करणार आहे. याबद्दल उत्सुक असल्याचे जडेजाने सांगितले आहे.

जडेजा गेल्यावर्षी आशिया चषक 2022 स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे त्याला टी२० वर्ल्डकपलाही मुकावे लागले होते. आता या दुखापतीतून सावरून तो 5 महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल त्याने बीसीसीआयला मुलाखत दिली आहे.

जडेजा म्हणाला, 'पाच महिन्यांपेक्षाही जास्त कालावधीनंतर पुन्हा भारतीय जर्सी घालण्यासाठी मी उत्सुक आणि आनंदी आहे. मी भाग्यशाली आहे की मला ही संधी पुन्हा मिळाली. इथपर्यंत येण्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.'

'कारण जर तुम्ही 5 महिने क्रिकेट खेळत नसाल, तर तुमच्यासाठी ते त्रासदायक बनते आणि नक्कीच मी पूर्ण फिट होण्याची आतुरतेने वाट पाहात होतो, ज्यामुळे मी भारतासाठी खेळू शकेल.'

याबरोबरच जडेजाने त्याच्यासाठी या दुखापतीतून सावरण्याचा प्रवास किती कठीण होता, याबद्दलही सांगितले.

तो म्हणाला, 'मी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होतो आणि शस्त्रक्रियेची गरजही होती. मला टी२० वर्ल्डकपच्या आधी की नंतर शस्त्रक्रिया करायची हा निर्णय घ्यायचा होता.पण डॉक्टरांनी मला वर्ल्डकपच्या आधी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. कारण या दुखापतीमुळे मी वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यताही कमी होती.त्यामुळे मी निर्णय घेतला की ही शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे'

'शस्त्रक्रियेनंतरचा काळ कठीण होता. कारण तुम्हाला सातत्याने रिहॅब आणि ट्रेनिंग करावी लागते. जेव्हा तुम्ही टीव्हीवर सामने पाहाता, तेव्हा तुमच्या फिटनेसबद्दलचे विचार तुमच्या डोक्यात येतात, जसे की जर तुम्ही वर्ल्डकप पाहात असाल, तर असे वाटते की कदाचीत मी तिथे असतो, असे.'

याबरोबरच जडेजाने त्याच्यावर फिजिओ आणि ट्रेनर्सने खूप मेहनत घेतली असल्याचेही सांगितले. त्याने सांगितले की बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील (NCA) फिजिओ आणि ट्रेनर्स रविवारी सुटी असतानाही त्याच्यावर उपचारासाठी यायचे. दुखापतीनंतरचे दोन महिने कठीण होते, कारण कुठेही जाता येत नव्हते.

तसेच जडेजा म्हणाला, या काळात त्याचे कुटुंब आणि मित्रांनी या कठीण काळात खूप पाठिंबा दिला आणि एनसीएमधील ट्रेनर्सने त्याचा आत्मविश्वास वाढवला. जडेजा म्हणाला, 'छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सावरण्याच्या प्रकियेत खूप प्रेरणा देत असतात.'

जडेजाने काहीदिवसांपूर्वीच रणजी ट्रॉफीमध्ये तमिळनाडूविरुद्ध सौराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात त्याने 8 विकेट्सही घेतल्या. याबद्दलही तो म्हणाला की 5 महिन्यांनंतर मोकळ्या मैदानात खेळताना चांगले वाटले, कारण इतके दिवस इनडोअर ट्रेनिंग सुरू होती. दरम्यान आता भारताकडून जडेजाचे पुनरागमन कसे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa Election 2024 Live: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Goa Election 2024 Voting: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT