Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: मास्टर-ब्लास्टरपेक्षा 14 डाव कमी खेळत कोहलीनं केला 'हा' विराट पराक्रम, गावसकरांचीही बरोबरी

India vs Australia: विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी दीडशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही विक्रमही केले आहेत.

Pranali Kodre

Virat Kohli 75th Century: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्याचा रविवारी चौथा दिवस होता. या दिवशी विराट कोहलीने शानदार फलंदाजी करताना दीडशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही विक्रमही केले आहेत.

विराटने 241 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक ठरले, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक ठरले. तो 75 आंतरराष्ट्रीय शतके करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतके करण्यासाठी 552 डाव खेळले.

त्यामुळे तो सर्वात जलद 75 आंतरराष्ट्रीय शतक करणाराही खेळाडू ठरला आहे. त्याने सचिनपेक्षा 14 डाव कमी खेळताना 75 शतके केली. सचिनने 566 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 75 शतके केली होती.

भारतात 14 वे शतक

विराटने केलेल्या 28 शतकांपैकी त्याने भारतात खेळताना 14 कसोटी शतके केली आहेत. त्यामुळे तो आता भारतात सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने या यादीत दिलीप वेंगसरकर, विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे टाकले आहे. या तिघांनीही भारतात प्रत्येकी 13 कसोटी शतके केली आहेत.

या यादीत 22 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ 16 शतकांसह सुनील गावसकर आणि 15 शतकांसह राहुल द्रविड आहे.

गावसकरांची केली बरोबरी

विराटचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे कसोटीमधील 8 वे शतक आहे. त्यामुळे त्याने कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील सुनील गावसकरांची बरोबरी केली आहे. गावसकरांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके केली आहेत. या यादीत 11 कसोटी शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे.

विराटचं द्विशतक हुकलं

दरम्यान, अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर बाद केल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता. भारताकडून आधी शुभमन गिलने 128 धावांची शतकी खेळी केली.

त्यानंतर विराटनेही दमदार खेळ करताना 364 चेंडू खेळत 15 चौकारांसह 186 धावांची खेळी केली. मात्र विराटचे द्विशतक केवळ 14 धावांनी हुकले. त्याला टॉड मर्फीने मार्नस लॅब्युशेनच्या हातून झेलबाद केले. विराट बाद होताच भारताचा पहिला डावही संपला. भारताने पहिल्या डावात 571 धावा करत 91 धावांची आघाडी मिळवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT