Shubman Gill | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 4th Test: तिसरा दिवस भारतीय फलंदाजांचा! गिलचं शानदार शतक, तर विराटनं ठोकली फिफ्टी

Ahmedabad Test: तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दमवलं असून शुभमन गिलने शतक केले, तर विराटने अर्धशतक ठोकले.

Pranali Kodre

India vs Australia, 4th Test: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. शनिवारी या सामन्यातील तिसरा दिवस होता. या दिवशी भारतीय फलंदाजांचे वर्चस्व राहिले.

तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने 99 षटकात 3 बाद 289 धावा केल्या आहेत. भारताकडून विराट कोहली 59 धावांवर आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर नाबाद आहे. दरम्यान, अद्याप भारतीय संघ 191 धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 11 व्या षटकापासून आणि बिनबाद 36 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने चांगला खेळ केला होता. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र, 21 व्या षटकात मॅथ्यू कुहनेमन याने रोहितला 35 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे रोहित आणि गिल यांची 74 धावांची सलामी भागीदारीही तुटली.

पण, त्यानंतर चेतेश्वर पुजाराने गिलला चांगली साथ दिली. एकीकडे गिलने काही आक्रमक शॉट खेळले, तर पुजाराने संयमी खेळ केला. त्यांनी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच दमवले.

त्यांच्या शतकी भागीदारी दरम्यान 62 व्या षटकात टॉड मर्फीविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर गिलने चौकार ठोकत त्याचे दुसरे शतक साजरे केले. पण याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मर्फीने पुजाराला 42 धावांवर पायचीत पकडले. त्यामुळे पुजाराला माघारी जावे लागले. गिल आणि पुजारा यांच्यात 113 धावांची भागीदारी झाली.

पुजारा बाद झाल्यानंतर गिलने अनुभवी विराट कोहलीला साथीला घेतले. फलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीवर या दोघांनीही चांगली भागीदारी रचण्यास सुरुवात केली. त्यांनी बघता बघता अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.

मात्र, गिलला 79 व्या षटकात लायनने पायचीत करत माघारी धाडले आणि भारताला मोठा धक्का दिला. गिलने 235 चेंडूत 128 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारला.

गिलची विकेट गेल्यानंतर विराट आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रविंद्र जडेजाने तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाला यश मिळू दिले नाही. त्यामुळे हे दोघेही तिसऱ्या दिवसाखेर नाबाद 44 धावांची भागीदारी करत नाबाद राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT