Yashasvi Jaiswal - Shubman Gill ANI
क्रीडा

IND vs ENG: जयस्वालचा द्विशतकी धमाका, सर्फराज-गिलचीही फिफ्टी; भारताने इंग्लंडसमोर ठेवलं 557 धावांचं लक्ष्य

India vs England, 3rd Test: जयस्वालच्या द्विशतकानंतर अन् सर्फराजच्या अर्धशतकानंतर भारतीय संघाने दुसरा डाव घोषित करत इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test at Rajkot:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात राजकोटमध्ये गुरुवारपासून कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (18 फेब्रुवारी) भारतीय संघाने दुसरा डाव 98 षटकात 4 बाद 430 धावांवर घोषित केला. यासह पहिल्या डावातील 126 धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे लक्ष्य ठेवले.

भारताकडून या डावात यशस्वी जयस्वाल 214 धावांवर नाबाद राहिला, तसेच सर्फराज खान 68 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी शुभम गिलनेही 91 धावांची खेळी केली.

या सामन्यात चौथ्या दवशी भारताने दुसऱ्या डावात 52 व्या षटकापासून आणि 2 बाद 196 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी शुभमन गिल 65 धावांवर, तर कुलदीप यादव 3 धावांवर नाबाद होता.

कुलदीप आणि गिल या दोघांनी चांगली सुरुवात करत भारताचा डाव पुढे नेला. त्यावेळी गिल शतक करेल, अशी अनेकांची अपेक्षा असेल. त्याने चांगले खेळत नव्वदीत प्रवेशही केला होता.

परंतु, 64 व्या षटकात एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याच्यात आणि कुलदीपमध्ये गोंधळ झाला. त्यावेळी स्टोक्सच्या थ्रोवर टॉम हर्टलीने गिल क्रिजमध्ये पोहण्याआधी बेल्स उडवले. त्यामुळे गिल 151 चेंडूत 91 धावा करून माघारी परतला.

त्यानंतर तिसऱ्या दिवशी शतक केल्यानंतर पाठीतील वेदनेमुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेला यशस्वी जयस्वाल पुन्हा फलंदाजीला आला. त्याने त्याच्या 104 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्याने तिसऱ्या दिवसाचीच लय चौथ्यादिवशीही कायम ठेवत फटकेबाजी केली. त्याने आक्रमक खेळ केला.

दरम्यान 72 व्या षटकात कुलदीपला रेहान अहमदने 27 धावांवर बाद केले. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या जयस्वालने 85 व्या षटकात तर जेम्स अँडरसन विरुद्ध सलग 3 षटकार मारले. त्याने नंतर त्याचे द्विशतकही पूर्ण केले. जयस्वालने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा द्विशतक केले. त्याचबरोबर त्याने या मालिकेत 500 धावांचा आकडाही पार केला.

जयस्वालला सर्फराज खाननेही चांगली साथ दिली. सर्फराजनेही चांगली फटकेबाजी केली. त्यानेही पदार्पणाच्या या सामन्यात दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. जयस्वालचे द्विशतक आणि सर्फराजचे अर्धशतक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहितने दुसरा डाव घोषित केला.

सर्फराज आणि जयस्वाल यांच्यात 172 धावांची नाबाद भागीदारी झाली. जयस्वालने 236 चेंडूत 214 धावांवर नाबाद राहिला. तसेच सर्फराज 72 चेंडूत 68 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, या डावात तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा 19 धावांवर आणि रजत पाटीदार शुन्यावर बाद झाले होते.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात रेहान अहमद, मार्क वूड आणि जो रुट यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT