Pakistan Team Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Team: पाकिस्तानची भारताला धमकी, 'विश्वचषकासाठी व्हिसा न मिळाल्याने...'

Pakistan Blind Cricket Team: सध्या सुरु असलेल्या ब्लाइंड T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या ब्लाइंड क्रिकेट संघाला भारत भेटीसाठी व्हिसा मिळालेला नाही.

दैनिक गोमन्तक

Pakistan Blind Cricket Team: सध्या सुरु असलेल्या ब्लाइंड T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या ब्लाइंड क्रिकेट संघाला भारत भेटीसाठी व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (PBCC) ने मंगळवारी एक निवेदन जारी करुन संघाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी मिळाली नसल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट परिषदेने हे वक्तव्य केले

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिलने एका निवेदनात म्हटले की, "या दुर्दैवी घटनेमुळे पाकिस्तानच्या ब्लाइंड क्रिकेट संघाचा तोल ढासळला आहे." सध्याच्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात होण्याची शक्यता होती आणि सध्याचा फॉर्म पाहता पाकिस्तान जेतेपद पटकावण्याची दाट शक्यता होती.

ही मोठी गोष्ट सांगितली

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल पुढे सांगितले की, "या भेदभावपूर्ण कारवाईचे जागतिक ब्लाइंड क्रिकेटवर गंभीर परिणाम होतील, कारण भविष्यात भारताला (India) आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद मिळू नये यासाठी आम्ही जागतिक ब्लाइंड क्रिकेटकडून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करु."

अंतिम सामना 17 डिसेंबरला होणार

ही स्पर्धा भारतात 5 डिसेंबर रोजी सुरु झाली असून अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे. पीबीसीसीने सांगितले की, "भारतीय ब्लाइंड क्रिकेट संघटनेने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्याची विनंती सरकारकडे केली होती, परंतु कोणीही त्यांचे ऐकले नाही."

12 संघ सहभागी होणार आहेत

आता या 12 दिवसांच्या स्पर्धेत भारत, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. फरिदाबाद, दिल्ली, मुंबई, इंदूर आणि बेंगळुरु येथे सामने खेळवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT