Kishore Jena and Neeraj Chopra  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games: भालाफेकीत नाद नाही करायचा! भारताच्या नीरजला सुवर्ण, किशोरला रौप्य पदक

Neeraj Chopra: आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली असून किशोर जेनानेला रौप्य जिंकले.

Pranali Kodre

Gold for Neeraj Chopra and Silver for Kishore Jena in Men's Javelin at 19th Asian Games Hangzhou, China:

चीनमध्ये सुरू असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी (४ ऑक्टोबर) भारतीय खेळाडूंची सुरुवातीपासूनच पदकांची लयलूट सुरू आहे. दरम्यान बुधवारी भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी घातली.

नीरजने ८८.८८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किशोर जेनाने ८७.५४ मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. नीरजची ही या हंगामातील सर्वोत्तम फेक होती, तर किशोरची ही वैयक्तिक सर्वोत्तम फेक ठरली. या स्पर्धेत जपानचा रोडेरिक जेन्की डिनने कांस्य पदक जिंकले.

नीरजने जिंकले दुसऱ्यांदा सुवर्ण

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. त्याने जकार्ताला २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

महिलांच्या भालाफेकीतही भारताचे वर्चस्व

दरम्यान, मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांची भालाफेक स्पर्धा पार पडली. यात भारताच्याच अन्नू राणीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने 62.92 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम कामगिरीही ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act: 'नारीशक्ती वंदन' विधेयक भविष्यात मंजूर होणार, काँग्रेसची भूमिका 'राष्ट्रविरोधी'- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सट्टेबाजीचा 'मास्टरमाईंड' बाबू खेमानीला मुंबईतून अटक, छाप्यांत सात जण ताब्यात; कोट्यवधींची उलाढाल

खरी कुजबुज: विरोधी आमदार आहेत कुठे?

सुविधांअभावी महामार्ग 'धोक्याचे मार्ग' बनू नयेत, मार्गदर्शक सूचना जारी; महामार्गावर अवजड वाहने उभी करण्यास आता मनाई

मृत मासेप्रकरणी न्यायालयाची स्वेच्छा दखल, सोमवारी सुनावणी; आरोग्‍य संचालनालयासह प्रतिवादींना स्‍पष्‍टीकरणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT