Indian Football Team IndianFootball
क्रीडा

FIFA World Cup Qualifiers: दुसऱ्या फेरीत भारतीय संघाची विजयी सुरुवात, कुवेतला घरच्या मैदानावर दिली मात

India Football Team: फिफा वर्ल्डकप 2026 साठी पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत भारताने कुवेतचा पराभव करत शानदार सुरुवात केली आहे.

Pranali Kodre

FIFA World Cup 2026 and AFC Asian Cup Saudi Arabia 2027 Qualification India vs Kuwait:

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आणि एएफशी आशियाई कप 2027 स्पर्धेसाठी चालू असलेल्या पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताने दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात गुरुवारी (16 नोव्हेंबर) कुवेतविरुद्ध 1-0 असा विजय मिळवला.

त्यामुळे आता भारताच्या खात्यात तीन गुण जमा झाले असून कतार, अफगाणिस्तान आणि कुवेत यांचा समावेश असलेल्या गटात भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या गटातील अव्वल दोन संघ पुढच्या फेरीत जाणार आहेत.

गुरुवारी कुवेतमधील जाबेर अल-अहमद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून मनवीर सिंगने एकमेव केला. त्याने 75 व्या मिनिटाला गोल केला. या सामन्यात लल्लियांझुआला छांगटेची कामगिरीही महत्त्वाटी ठरली. त्याने डाव्या पायाने केलेल्या हालचालींसाठी कुवेकच्या डिफेन्सकडे उत्तर नव्हते.

या सामन्यात भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी एक खेळी केली, त्यांनी छांगटेला सुरुवातीच्या 11 जणांमध्ये खेळवले नव्हते. त्यांनी त्याला 64 व्या मिनिटाला मैदानात उतरवले. ही चाल यशस्वी ठरली. त्याने कुवेतचा डिफेन्स भेदला. ज्यामुळे मनवीरला गोलची संधी मिळाली.

त्याआधी भारतीय संघाने अनेकदा कुवेतचा डिफेन्स भेदण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय खेळाडूंना गोल करण्यात अपयश येत होते.

दरम्यान काही महिन्यांपूर्वीच भारताने कुवेतला पेनल्टी शुटआऊटमध्ये मात देत SAFF चॅम्पियनशीप जिंकली होती.

दरम्यान आता भारतीय संघ दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बलाढ्य कतारविरुद्ध खेळेल. हा सामना भुवनेश्वरला होणार आहे. कतारने अफगाणिस्तानला 8-1 अशा फरकाने पराभूत करत गटात अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. दरम्यान, आता जर भारतीय संघाने पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर पहिल्यांदाच भारतीय संघ फिफा वर्ल्डकप पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत खेळताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT