Indian Men's Team Dainik Gomantak
क्रीडा

Asian Badminton Championship: भारताने उडवला हाँगकाँगचा धुव्वा

जागतिक चॅम्पियनशिपमधील (BWF World Championship) कांस्यपदक विजेता असणाऱ्या लक्ष्य सेन च्या (Lakshya Sen) नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने मोठी कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक चॅम्पियनशिपमधील (BWF World Championship) कांस्यपदक विजेता असणाऱ्या लक्ष्य सेन च्या (Lakshya Sen) नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने मोठी कामगिरी केली आहे. गुरुवारी अ गटातील हाँगकाँगचा 3-2 ने पराभव करुन बॅडमिंटन आशियाई सांघिक (Badminton Asia Team Championships) स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. या विजयाने नव्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, कोरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 0-5 अशा पराभवामुळे संघाला बाद फेरीत स्थान मिळवणे कठीण झाले होते. भारत सध्या एक विजय आणि एक पराभवासह अ गटात तिसऱ्या क्रमांकावर आहे. (India Defeats Hong Kong In Asian Badminton Championship)

दरम्यान, अ गटातून, गतविजेता इंडोनेशिया (Indonesia) आणि कोरिया सध्या बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. इंडिया ओपन विजेते लक्ष्य, मिथुन मंजुनाथ आणि हरिहरन ए आणि रुबेन आर या दुहेरी जोडीने गुरुवारी भारतासाठी विजयाची नोंद केली.

तसेच, जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने प्रथम कोर्टात उतरुन जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या ली चेउक यिउचा 35 मिनिटांत 21-19, 21-10 असा पराभव करुन भारताला शानदार सुरुवात करुन दिली. लाउ चेक हिम आणि ली चुन हे रेजिनाल्ड यांनी मनजीत सिंग ख्वेराकपम आणि डिंकू सिंग कोन्थोजम या जोडीचा 20-22, 21-15, 21-18 या रोमांचक दुहेरी सामन्यात पराभव करुन हाँगकाँगची 1-1 अशी बरोबरी केली.

किरण जॉर्ज हरले

ओडिशात (Odisha) पहिल्यांदाच सुपर 100 टूर्नामेंट जिंकणाऱ्या किरण जॉर्जला चेन यिन चेककडून 13-21, 21-179-21असे पराभूत व्हावे लागले. हाँगकाँगने (Hong Kong) हरिहरन आणि रुबेन यांच्यावर 2-1 अशी आघाडी घेतल्याने मात्र, नंतर चाऊ हिन लाँग आणि लिउ चुन वेई यांचा 21-17, 21-16 असा पराभव करत भारताने बरोबरी साधली. सय्यद मोदी सुपर 300 टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या मंजुनाथने त्यानंतर जेसन गुणवानचा 21-14, 17-21, 21-11 असा पराभव करुन भारताचा 3-2 असा विजय निश्चित केला.

इंडोनेशियाचे आव्हान

बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला आता शुक्रवारी गतविजेत्या इंडोनेशियावर मात करावी लागणार आहे. कोरियाच्या हाँगकाँगविरुद्धच्या पराभवासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. भारत आणि कोरिया या दोघांनीही फक्त एक सामना जिंकला असून एक गमावला आहे. शुक्रवारी दोन्ही संघांनी विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात मलेशियाविरुद्ध 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या संघाचा शुक्रवारी दुसरा सामना गतविजेत्या जपानशी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT