Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: कोहलीचं 'विराट' शतक, भारताने लगावला विजयी चौकार; बांगलादेशचा 7 विकेट्सने पराभव

IND vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

IND vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने भारताला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली.

दरम्यान, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. मात्र, 13व्या षटकात महमूद हसनने रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर 20 व्या षटकात गिल मेहदी हसन मिराझचा बळी ठरला.

श्रेयस अय्यरने 25 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. मात्र, मिराजने 30व्या षटकात अय्यरला आपल्या जाळ्यात अडकवले. 178 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र शेवटी, भारताने 41.3 षटकांत तीन विकेट गमावून सहज या लक्ष्याचा पाठलाग केला.

विराटने शानदार शतकी खेळी खेळली. 97 चेंडूत 103 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

तर केएल राहुलने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. कोहली आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करुन भारताच्या (India) विजयावर शिक्कामोर्तब केला.

दुसरीकडे, लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 66 धावा केल्या.

भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने 2-2 बळी घेतले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. तनजीद हसन आणि लिटन दास यांच्यात पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली.

याचदरम्यान, बांगलादेशच्या (Bangladesh) डावाच्या नवव्या षटकात हार्दिक पांड्याला दुखापत झाली. 43 चेंडूत 51 धावा केल्यानंतर तनजीद हसन एलबीडब्ल्यू झाला.

कुलदीपने भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर रवींद्र जडेजाने कर्णधार नझमुल हुसैन शांतोला वैयक्तिक 8 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सिराजने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत मेहदी हसन मिराजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. केएल राहुलने विकेटच्या मागे अप्रतिम झेल घेतला. जडेजाने लिटन दासला झेलबाद केले, लिटनने 82 चेंडूत 66 धावा केल्या.

शार्दुल ठाकूरने तौहीद हृदयला बाद करुन सामन्यातील पहिली विकेट घेतली. बुमराहने मुशफिकर रहीमला बाद केले. त्याने 38 धावा केल्या. महमुदुल्लाहने झटपट 46 धावा केल्या पण शेवटच्या षटकात बुमराहच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT