Team India Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 3rd ODI: भारताचा मालिका विजय! फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी उडवली विंडिजची दाणादाण

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजला तिसऱ्या वनडेत पराभूत करत मालिकेवरही कब्जा केला.

Pranali Kodre

West Indies vs India, 3rd ODI: भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (1 ऑगस्ट) वेस्ट इंडिजला वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 200 धावांनी पराभूत केले. त्रिनिदादला झालेल्या या सामन्यातील विजयामुळे भारताने ३ सामन्यांची वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी तब्बल 352 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजला मुकेश कुमारने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्याने ब्रेंडन किंग आणि काईल मेयर्स या सलामीवीरांच्या जोडीला माघारी धाडले. तसेच कर्णधार शाय होपलाही त्याने 5 धावांवरच बाद केले.

नंतरच्या विकेट्स जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी स्वस्तात घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. तरी अलिक अथानाझने 32 धावा करत एक बाजू सांभाळली होती. पण त्यालाही कुलदीपने त्रिफळाचीत केले.

तसेच अखेरीस अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी 9 व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करत कसेबसे वेस्ट इंडिजला 140 धावांचा टप्पा पार करून दिला.पण अल्झारीला 26 धावांवर शार्दुलने बाद केले. त्यानंतर जेडेन सील्सही 1 धावेवर बाद झाला आणि वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. गुडाकेश 39 धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमारने ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि जयदेव उनाडकटने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दले. त्यानुसार प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून इशान किशन आणि शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. या दोघांनीही अर्धशतके झळकावताना 143 धावांची भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी इशानला यानिक कॅरियाने बाद केल्याने तुटली.

इशान 64 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ऋतुराज गायकवाडही ८ धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर शुभमन गिलला संजू सॅमसनने आक्रमक खेळत चांगली साथ दिली. त्यानेही अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 41 चेंडूत 51 धावा केल्या.

त्यानंतर गिल 92 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. पण, त्यानंतरही कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजीची लय कायम ठेवली. त्याला सूर्यकुमारची साथ मिळाली. हार्दिकनेही अर्धशतक झळकावले. पण सूर्यकुमार यादव 35 धावा करून बाद झाला. पण तोपर्यंत भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडला होता.

अखेरीस हार्दिकच्या फटकेबाजीमुळे भारताने 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या. हार्दिक 52 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 70 धावांची नाबाद खेळी केली. रविंद्र जडेजा 8 धावांवर नाबाद राहिला.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने 2 विकेट्स घेतल्या. अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT