India vs Japan | Asian Champions Trophy  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Champions Trophy Hockey: चीनविरुद्ध दणक्यात विजयानंतर भारतीय संघाची जपानविरुद्ध बरोबरी

Indian Hockey Team: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला जपानविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Pranali Kodre

India and Japan 1-1 draw in Men's Asian Champions Trophy Chennai 2023 Hockey: आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 हॉकी स्पर्धा चेन्नईत सुरू आहे. या स्पर्धेत गुरुवारी भारतीय संघाने 7-2 अशा गोलफरकाने पराभूत करत मोहिमेला दणक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी मात्र भारतीय हॉकी संघाला जपानविरुद्ध 1-1 अशा बरोबरीसह समाधान मानावे लागले.

चेन्नईतील मेयर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने, तर जपानकडून केन नागायोशीने गोल केला.

पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने भारतावर दबाव ठेवण्यात यश मिळवले होते. पण भारतानेही सलग पेनल्टी कॉर्नर मिळवत चांगला प्रतिकार केला होता. या क्वार्टरमध्ये कोणालाही गोल करता आला नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीला भारताला दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण आकाशदीप सिंग आणि गुरजंत यांना गोल करण्यात यश आले नाही. तसेच सुमितनेही एक संधी मिळवले होती. मात्र योशिकावाने चांगला बचाव करत गोल वाचवला.

अखेर दुसरा क्वार्टर संपण्यासाठी 2 मिनिट राहिलेले असतानाच सामन्याच्या 28 व्या मिनिटाला भारताने जपानला पेनल्टी कॉर्नर दिला, ज्यावर जपानकडून नागायोशिने गोल करण्यात यश मिळवले. याबरोबर जपानने 1-0 अशी आघाडीही घेतली. जपानने अखेरच्या मिनिटालाही गोल करण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णन पाठकने चांगला बचाव केला.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पुनरागमन करण्याता प्रयत्न केला. सामन्याच्या 43 व्या मिनिटाला हार्दिक सिंगच्या प्रयत्नामुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचा फायदा लयीत असलेल्या हरमनप्रीतने घेतला.

त्याने शानदार फ्लिकसह गोल नोंदवला. त्यामुळे त्याने भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर मात्र, दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

याबरोबरीमुळे भारतीय संघ गुणतालिकेत मलेशियाच्या खाली 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता भारताचा तिसरा सामना मलेशियाविरुद्ध 6 ऑगस्टला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT