Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 1st T20: उत्साही चहल! बॅटिंगला पाठवायचं होतं मुकेशला पोहोचला युझी, कन्फ्यूजन झाल्यावर...

WI vs IND, 1st T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे.

Manish Jadhav

WI vs IND, 1st T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा यजमान वेस्ट इंडिजकडून चार धावांनी पराभव झाला.

मात्र, या सामन्यादरम्यान असे काही पाहायला मिळाले, जे तुम्ही याआधी पाहिले नसेल. कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कन्फ्यूजनमुळे गोंधळ उडाला, त्यानंतर पंचांना हस्तक्षेप करावा लागला. जगातील नंबर-1 टी-20 संघाकडून अशा चुकीची अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.

टीम इंडियाने (Team India) आठवी विकेट गमावली तेव्हा यजुवेंद्र चहल फलंदाजीसाठी सज्ज झाला होता. चहल त्याच्या अफलातून गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण त्याच्या खराब फलंदाजीबद्दल सर्वांनाच माहिती आहे.

कुलदीप यादव नऊ चेंडूत सात धावा करुन बाद झाला तेव्हा चहल हेल्मेट आणि बॅट घेऊन मैदानाकडे निघाला. दरम्यान, कर्णधार हार्दिक आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला मध्येच रोखले.

दरम्यान, चहलऐवजी मुकेश कुमारने फलंदाजीसाठी जावे असे हार्दिक आणि द्रविड यांना वाटत असावे. मुकेश कुमार आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता आणि त्याला 11व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे होते.

इतक्यातच चहल मैदानात पोहोचला. हार्दिक आणि द्रविडने चहलला मध्येच रोखल्यावर हा सगळा गोंधळ पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला.

वास्तविक, आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, जर एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर परतत असेल आणि पुढचा फलंदाज मैदानावर पोहोचला असेल, तर तुम्ही दुसऱ्या फलंदाजाला पाठवू शकत नाही.

अशा परिस्थितीत चहल मैदानावर पोहोचला नसता तर त्याच्या जागी मुकेशला पाठवता आले असते, पण तसे झाले नाही. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाला 20 षटकांत 9 विकेट्सवर 145 धावाच करता आल्या. पदार्पणाच्या सामन्यात तिलक वर्माने 22 चेंडूत 39 धावा केल्या, पण त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष काही करु शकला नाही. या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 6 ऑगस्ट रोजी गयाना येथे खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT