Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 2nd Test: दुसऱ्या कसोटीत कोहली करणार 'हा' विराट रेकॉर्ड, द वॉल ही करु शकला नाही...

Virat Kohli Record: वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 20 जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs WI, 2nd Test: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 20 जुलै रोजी त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 'विराट' विक्रम करणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli) या कसोटी सामन्यात इतका मोठा विक्रम करेल, जो सध्याच्या काळात कोणताही फलंदाज करु शकला नाही. राहुल द्रविडसारखा महान फलंदाजही त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा महान विक्रम करु शकला नाही.

दुसऱ्या कसोटीत कोहली हा 'विराट' विक्रम करणार आहे

त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 39 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 25,500 धावा पूर्ण करेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही मोठी कामगिरी करणारा विराट कोहली हा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

राहुल द्रविडसारख्या (Rahul Dravid) महान फलंदाजालाही त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ही कामगिरी करता आलेली नाही. सध्या विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,461 धावांचा विक्रम आहे.

सचिननंतर असा पराक्रम करणारा..

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही मोठी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हा विक्रम करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.

विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,461 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडसारखा महान फलंदाजही त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा महान विक्रम करु शकला नाही.

द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,208 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडसारख्या दिग्गजांना त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 25,000 धावाही पूर्ण करता आल्या नाहीत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा

2. कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा

4. महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा

6. विराट कोहली (भारत) - 25461 धावा

7. राहुल द्रविड (भारत) - 24208 धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतके

2. विराट कोहली (भारत) - 75 शतके

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतके

4. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतके

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतके

6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT