quinton de kock

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Ind Vs SA: सेंच्युरियनमधील पराभवानंतर 'या' स्टार खेळाडूने कसोटी क्रिकेटला केला अलविदा!

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने (quinton de kock) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत यापुढे सहभागी होणार नाही. त्याने तत्काळ कसोटी क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन (Centurion) कसोटीत गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पहिल्या कसोटीत 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या स्टार क्रिकेटरच्या निवृत्तीची माहिती सर्व चाहत्यांसोबत शेअर केली. 29 वर्षीय डेकॉकने (quinton de kock) दक्षिण आफ्रिकेसाठी 54 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 3300 धावा केल्या आहेत. 6 शतके आणि 22 अर्धशतके झळकावणाऱ्या या फलंदाजाने फेब्रुवारी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या फॉरमॅटमध्ये नाबाद 141 ही डेकॉकची सर्वोत्तम खेळी होती. डेकॉकचे यष्टिमागेही अतुलनीय योगदान दिले होते. त्याने 54 सामन्यांमध्ये 232 विकेट घेतल्या, त्यापैकी 221 झेल आणि 11 यष्टिरक्षण होते.

निवृत्ती घेताना डी कॉक म्हणाला, ''मी सहजासहजी घेतलेला निर्णय नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी, माझे आगामी काळात भविष्य कसे असेल याचा खूप विचार केला. सध्या माझे प्राधान्य साशा आणि मी आमचे पहिले मूल यांना असणार आहे. आमच्या कुटुंबात एका चिमुकल्याचे आगमन होणार असल्याने आम्ही आनंदी आहोत. माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व असणार आहे. त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा हीच माझी इच्छा आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT