Virat Kohli & Haris Rauf  Twitter/ @BCCI
क्रीडा

IND Vs PAK सामन्यानंतर या पाकिस्तानी खेळाडूला विराटने दिले खास गिफ्ट; Video

IND Vs PAK: पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेटर्सची ऑनफिल्ड केमिस्ट्री पाहून आता सगळेच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

IND Vs PAK: पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेटर्सची ऑनफिल्ड केमिस्ट्री पाहून आता सगळेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एक काळ असा होता की, भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होत असल्यास खेळाडूंमधील स्लेजिंग सामन्य मानली जायची. परंतु आता दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये एकमेकांबद्दलचा आदर स्पष्टपणे दिसतो. सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला एक संस्मरणीय भेट दिली आहे. धोनीने स्वाक्षरी केलेली CSK ची जर्सी असणाऱ्या रौफकडे आता विराटने स्वाक्षरी केलेली भारतीय संघाची जर्सी असणार आहे.

दरम्यान, सामन्यानंतर विराटने रौफला ही खास भेट दिली. बीसीसीआय टीव्हीने यासंबंधीचा व्हिडिओ देखील ट्विट केला. हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, 'सामना संपेल, परंतु असे क्षण...'

दुसरीकडे, पाकिस्तानने (Pakistan) भारतापुढे 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर 19.4 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा करुन भारताने (India) सामना जिंकला. तीन बळी आणि नाबाद 33 धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT