Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: शमीकडे बोट दाखवणाऱ्यांना कोहलीने दिले चोख प्रत्युत्तर

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) सामन्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावर मोहम्मद शमीबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) सामन्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावर मोहम्मद शमीबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर तो मोहम्मद शमीच्या ऑनलाइन ट्रोलिंगच्या मुद्द्यावरुन संतापलेला दिसून आला. विराट यावेळी म्हणाला की, 'खेळाडू म्हणून आमचे काम खेळणे आहे. बाहेरचे लोक काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे लक्ष पूर्णपणे सामन्यावर असते. अशा प्रकारच्या नाटकावर आम्ही लक्ष देत नाही.'

कोहली म्हणाला, 'सोशल मीडियावर असे काही लोक आहेत जे आपली ओळख लपवून अशी कृत्ये करतात, आजच्या युगात या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. जेव्हा आपण ती चिन्हे अशा प्रकारे बनवतो, तेव्हा आपले लक्ष आपल्या ड्रेसिंग रुमचे वातावरण चांगले ठेवण्यावर असते. बाहेर जे काही नौटंकी घडते, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही.'

विराट कोहली शमीच्या समर्थनार्थ बोलला

विराट कोहलीने स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माच्या आधारे लक्ष्य केले जाऊ शकत नाही. जर तसे करण्यात येत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी कोणाशीही अशाप्रकारे वागत नाही. परंतु सोशल मिडियावरुन काही लोक धर्माचा आधार घेत खेळाडूंवर निशाणा साधतात. मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. तरी त्याच्या खेळात त्याने काय सुधारणे करावी हे त्याने पाहावे. मी त्याच्यासाठी काहीही करु शकत नाही. तसेच मला अशा ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही. आम्ही शमीच्या पाठीशी 200 टक्के उभे राहू. आणि बाहेरच्या लोकांच्या वर्तनाचा आपल्या संबंधांवर परिणाम होऊ शकत नाही.

पांड्या तंदुरुस्त - विराट कोहली

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने हार्दिक पांड्याच्या फिटनेसबद्दलही सांगितले. विराटने म्हटले की, 'हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त आहे, जर सहाव्या गोलंदाजाची गरज असेल तर तो त्याच्यासाठी तयार राहू शकतो. त्याच्याशिवाय तो स्वत: गोलंदाजीबद्दलही बोलला.' विराटला शार्दुल ठाकूरच्या संघातील स्थानाबद्दल विचारले असता तो म्हणाला, तो आमच्या नियोजनाचा एक भाग आहे. त्यांच्यात क्षमता आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT