Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: न्यूझीलंड संघात भीतीचे वातावरण! टीम इंडियात परतला हा 'काश्मीरी वाघ'

India vs New Zealand: टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजासाठी ही मालिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज (20 नोव्हेंबर) होणार आहे. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर एक घातक वेगवान गोलंदाजही संघात परतला आहे. टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजासाठी ही मालिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या खेळाडूला काही सामन्यांनंतरच संघातून वगळण्यात आले होते.

या खेळाडूचे संघात पुनरागमन झाले

न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) स्थान देण्यात आले आहे. तो आयपीएल 2022 पासून चर्चेत आहे, परंतु काही काळासाठी तो टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळवू शकला नाही. मात्र, यावेळी त्याने टी-20 तसेच एकदिवसीय संघातही आपले स्थान निश्चित केले आहे. काश्मीरचा रहिवासी उमरान मलिक 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकतो.

आयर्लंड दौऱ्यावर पदार्पण केले

उमरान मलिकने यावर्षी आयर्लंडविरुद्ध पदार्पण सामना खेळला. मात्र, उमरान मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएल 2022 च्या चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करु शकला नाही. त्यामुळे 3 सामन्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. उमरान मलिक आता पुन्हा एकदा संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

टीम इंडियासाठी 3 सामने खेळले

उमरान मलिकने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 12.44 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या असून 2 विकेट घेतल्या आहेत. त्याची खराब कामगिरी पाहता त्याला संघातून वगळण्यात आले होते. उमरान मलिकने टीम इंडियासाठी शेवटचा सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) खेळला होता. तर आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT