Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: 'मालिका जिंकायची असेल तर...,' कर्णधार धवनला या दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने कर्णधार शिखर धवनला मोलाचा सल्ला दिला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या अनेक स्टार खेळाडूंनी अत्यंत खराब कामगिरी केली. त्याच्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

वसीम जाफर यांनी ही माहिती दिली

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सांगितले की, 'दुसर्‍या वनडेत आम्ही कुलदीप यादवला यजुवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी पाहू शकतो, कारण त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. तसेच, आपण अर्शदीप सिंगच्या जागी दीपक चहरला (Deepak Chahar) पाहू शकतो, कारण तो चेंडू उत्तम स्विंग करतो.'

पहिल्या वनडेत खराब कामगिरी

यजुवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांना न्यूझीलंडविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. चहलने यावर्षी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत, परंतु टी-20 विश्वचषकात तो एकही सामना खेळला नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात चहलने 10 षटकात 66 धावा दिल्या होत्या. तर, यावर्षी अर्शदीपने टी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली, परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्यात 8.1 षटकात 68 धावा देऊन त्याला एकही बळी घेता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT