BCCI ने इंग्लंडमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Eng: सुर्यकुमारच्या रुपाने भारतीय संघासाठी होणार का नवीन सुर्योदय

BCCI ने इंग्लंडमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यामध्ये देवदत्त पड्डिकल याला मात्र इंग्लंडचे तिकिट मिळालेले नाही.

दैनिक गोमन्तक

India vs England: BCCI ने इंग्लंडमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यामध्ये देवदत्त पड्डिकल याला मात्र इंग्लंडचे तिकिट मिळालेले नाही. इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील वाशिंगटन सुंदर, अवेश खान आणि शुभमन गिल हे खेळाडू जायबंदी झाल्याने त्यांच्याजागी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांना पाठविण्यात येणार आहे. 2021 हे साल सुर्यकुमारसाठी नवीन सुर्योदयासारखेच आहे. 2021 मध्ये त्याने आधी टी-20 नंतर एकदिवसीय आणि आता थेट कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळविले आहे. त्यामुळे आता सुर्यकुमारच्या रुपाने इंग्लंडमध्ये भारतीय संघात नवीन सुर्योदय व्हावा आणि इंग्लंड विरुध्दची मालिका भारताने जिंकावी, अशी सर्वच चाहत्यांची अपेक्षा आहे.

वॉशिंगटन सुंदरला बॉलिंग फिंगरला दुखापत झाली आहे. त्याच्या रिकव्हरिला वेळ लागणार आहे. तर अवेश खानला देखील बोटला दुखापत झाली असून, त्याचे ते बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो देखील इंग्लंडविरुध्दच्या मालिके बाहेर झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या जागेवर पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमारला पाठविले जाईल. सलामीचा फलंदाज शुभमन गिल हा देखील जायबंदी झाला असला तरी त्याच्या जागी कोणालाही पाठविण्यात आलेले नाही.

मुंबईचा राईट हँडर फलंदाज सुर्यकुमार यादव याने सातत्याने प्रभावी कामगिरी करीत निवडसमितीचे लक्ष्य वेधले आहे. त्यामुळे त्याला 2021 मध्ये आधी टी-20, नंतर एकदिवसीय संघाची दारे खुली झाली. पण श्रीलंकेत केलेल्या कामगिरीमुळे त्याला कसोटी क्रिकेटची दरवाजे उघडली आहेत. त्यामुळे 2021 हे वर्षे सुर्यकुमारच्या रुपाने भारतीय संघात नवीन सुर्योदय घेऊन येणार हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT