Mohammed Siraj Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 2nd ODI: सिराज-शांतोमध्ये राडा! लाईव्ह मॅचमध्ये एकमेकांना भिडले अन् मग...

बांगलादेश विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या वनडेदरम्यान सिराज आणि शांतो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Pranali Kodre

IND vs BAN, 2nd ODI: बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात बुधवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. अखेरच्या क्षणापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यांत भारताला केवळ 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि बांगलादेशचा फलंदाज नजमुल हुलैन शांतो यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसले.

झाले असे की प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडले होते. दरम्यान दुसऱ्याच षटकात सलामीवीर अनामुल हकला सिराजने बाद केले होते. त्यामुळे शांतो फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

त्यानंतर कर्णधार लिटन दाससह शांतो बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी 8 व्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर शांतोने चौकार ठोकला. पण त्यानंतर सिराजने टाकलेल्या पुढील दोन चेंडूंवर शांतोला धाव काढता आली नाही. पण वेगाने आलेल्या चौथ्या चेंडूवर शांतो खाली वाकला.

यानंतर सिराज लगेचच शांतोच्या जवळ गेला आणि त्याला काहीतरी म्हणाला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले, पण त्यांच्यात नक्की काय वाद झाले हे स्टंप माईकमधून ऐकू आले नाही. पण या बाचाबाचीनंतर पाचव्या चेंडूवर शांतोने पुन्हा एकदा चौकार ठोकला.

दरम्यान, शांतो फार काळ टिकू शकला नाही. 14 व्या षटकात उमरान मलिकने ताशी 151 किमी वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

भारताने गमावली मालिका

दुसरा वनडे सामनाही गमावल्याने मालिकाही गमावण्याची वेळ भारतीय संघावर ओढावली आहे. भारताने पहिला सामनाही केवळ 1 विकेटने गमावला होता. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताला प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असेल.

दुसऱ्या वनडेत बांगलादेशने 69 धावांत 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर महमुद्दुलाह आणि मेहदी हसन मिराज यांनी 148 धावांची भागीदारी करत बांगलादेशला सन्मानजनक 271 धावसंख्या उभारून दिली.

महमुद्दुलाहने 77 धावांची खेळी केली, तर मेहदी हसनने नाबाद 100 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

नंतर भारतानेही सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्या. मात्र, नंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. पण, श्रेयस 82 धावांवर आणि अक्षर 56 धावांवर बाद झाला.

यानंतर दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार रोहित शर्मा 9 व्या क्रमांकावर मैदानावर आला आणि आक्रमक फलंदाजी करत नाबाद 51 धावांची खेळी केली. मात्र, त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. बांगलादेशकडून इबादत हुसैनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT