Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AUS: 0,0,0…पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल; केला 'हा' लाजिरवाणा रेकॉर्ड

ICC ODI Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होत आहे.

Manish Jadhav

ICC ODI Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होत आहे. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला 199 धावांत रोखले.

भारताला 200 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाकड़ून देण्यात आले आहे. टीम इंडिया हे लक्ष्य सहज गाठेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण कांगारु गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली.

या सामन्यात शुभमन गिल खेळला नाही आणि त्याच्या जागी इशान किशनने डावाला सुरुवात केली. पण तो काही विशेष करु शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवरच बाद झाला.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यरला एकाच षटकात जोश हेझलवूडने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. झाले असे की, भारतीय आघाडीचे तीन फलंदाज खाते न उघडताच शून्यावर बाद झाले.

क्रिकेटमध्ये हे सहसा पाहायला मिळत नाही. पण विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात हे पाहून भारतीय चाहत्यांची नक्कीच निराशा झाली असेल. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच असे घडले की, पहिले तीनही खेळाडू शून्यावर बाद झाले.

एवढेच नाही तर हा आकडा पाहिल्यानंतर भारताने गेल्या विश्वचषकात जिथून आपली वाटचाल संपवली होती, तिथून ती भितीदायक आकृती समोर आली. न्यूझीलंडविरुद्ध 2019 च्या उपांत्य फेरीत भारताची धावसंख्या 5 धावांत तीन विकेट्स होती.

30 वर्षांनंतर विश्वचषकात हे घडले

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले की, भारतीय सलामीवीर खाते न उघडताच बाद झाले.

यापूर्वी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध असे घडले होते, जेव्हा भारतीय सलामीवीर खाते न उघडता बाद झाले होते. आता 30 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकात हे घडले आहे. मात्र, तो विश्वचषक आणि तो सामना भारतीय संघाने जिंकला होता.

भारतीय गोलंदाजांनी कमाल केली

सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. विशेषत: फिरकीपटूंनी कांगारुंच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) तीन, कुलदीप यादवने दोन आणि रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली.

तिघांनी मिळून 6 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तर जसप्रीत बुमराहने 2 तर सिराज आणि पांड्याने 1-1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकात 199 धावांवर सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT