Virat Kohli & Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS Test: टेन्शन नॉट! रोहित-विराटचा सर्वात मोठा शत्रू पहिल्या सामन्याला मुकणार

IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा एक मोठा सामना विजेता खेळाडू या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. या खेळाडूने स्वतः पहिल्या कसोटीत न खेळण्याची पुष्टी केली आहे. दोन्ही संघांमधील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात होणार आहे.

हा खेळाडू पहिल्या कसोटीतून बाहेर

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत खेळता येणार नसल्याची पुष्टी केली आहे. तो बोटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्कच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यानंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो खेळला नाही. मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वात मोठा सामनाविजेता आहे. त्याची एक्झिट संघासाठी मोठा धक्का ठरणार आहे.

स्टार्कने त्याच्या फिटनेसबद्दल हे मोठे अपडेट दिले

स्टार्कला त्याच्या फिटनेसबद्दल विचारले असता, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला की, 'मी तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, अजून काही आठवडे लागतील. पहिली कसोटी जिंकून आम्ही दिल्लीत पोहोचू, अशी अपेक्षा आहे. पहिली टेस्ट 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात (Nagpur) आणि दुसरी टेस्ट 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे.'

स्टार्क व्यतिरिक्त, कॅमेरुन ग्रीन देखील बॉक्सिंग डे टेस्टमध्ये प्रोटीजवर विजय मिळविल्यापासून बोटाच्या समस्येशी झुंज देत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुखापत झाली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी झेल घेण्याचा प्रयत्न करताना स्टार्कच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. तो फक्त डाव्या हाताने गोलंदाजी करतो. स्टार्कला त्याच्या मधल्या बोटाला दुखापत झाल्याचे निदान झाले. त्यानंतर सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीला तो मुकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैसा, नोकरी आणि यश! गुरुवार 'या' राशींच्या व्यक्तींसाठी ठरणार खास, मिळू शकतो आर्थिक लाभ अन् प्रगतीचा योग

Children Screen Time Control: मुलांच्या 'स्क्रीनटाईम'वर हवं नियंत्रण; आधी पालकांनीच मोबाईल बाजूला ठेवायला हवा

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT