Mitchell Starc Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AUS: इशानला आऊट करताच मिचेल स्टार्कने केला मोठा रेकॉर्ड, भारतीय फलंदाज...

ODI World Cup 2023: कांगारु गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला लवकरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Manish Jadhav

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होत आहे. कांगारु गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला लवकरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

स्टार्कने भारताचा सलामीवीर इशान किशनला शून्य धावांवर बाद केले. या विकेटसह स्टार्कने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या इतिहासात त्याने अवघ्या 18 डावात 50 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताने 2 धावांत 3 विकेट गमावल्या

मिचेल स्टार्कने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच सामन्यात दाखवून दिले की, त्याला जगातील नंबर वन गोलंदाज का म्हटले जाते. या विश्वचषकात स्टार्क हाहाकार माजवू शकतो, असे या सामन्यापूर्वीच मानले जात होते.

हे विधान खरे करत त्याने आतापासूनच स्पर्धेत आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. स्टार्कने इशानला पहिल्याच षटकात बाद केले.

भारताच्या (India) डावाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने आपले तीन फलंदाज शून्यावर गमावले. अवघ्या 2 धावांवर भारताने तीन विकेट गमावल्या.

सर्वात कमी चेंडूत 50 विकेट्स

मिचेल स्टार्कने 50 विकेट घेण्यासाठी केवळ 941 चेंडू खर्च केले. अशा स्थितीत त्याने अर्धशतक झळकावण्यासाठी सर्वात कमी चेंडू खर्च केले आहेत. स्टार्कनंतर लसिथ मलिंगाने 1187 चेंडूत 50 बळी घेतले.

तिसऱ्या स्थानावर ग्लेन मॅकग्रा आहे, ज्याने 1540 चेंडू खर्च करुन 50 बळींचा आकडा गाठला. चौथ्या स्थानावर एम मुरलीधरन आहे, ज्याने 1562 चेंडू खर्च केले. याशिवाय, वसीम अक्रम पाचव्या स्थानावर आहे, ज्याने 1748 चेंडू खर्च केले होते.

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आहे, त्याने 71 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर मुथय्या मुरलीधरन असून त्याच्या नावावर 68 विकेट्स आहेत. तिसऱ्या स्थानावर लसिथ मलिंगा आहे, ज्याने 56 विकेट घेतल्या आहेत.

यानंतर वसीम अक्रम चौथ्या स्थानावर आहे, त्याने वर्ल्ड कपमध्ये (World Cup) आतापर्यंत 55 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, पाचव्या स्थानावर मिचेल स्टार्क आहे, ज्याने आजच आपली 50वी विकेट घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT