IND vs AUS Border–Gavaskar Trophy
IND vs AUS Border–Gavaskar Trophy Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान मोठी भविष्यवाणी , 'हा' अष्टपैलू खेळाडू...!

Manish Jadhav

IND vs AUS Border–Gavaskar Trophy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार किम ह्यूजने मोठे वक्तव्य केले आहे.

किम ह्यूजने एका अष्टपैलू खेळाडूचे नाव दिले आहे, ज्यात दीर्घकाळ जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून राहण्याची क्षमता आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर हा खेळाडू नुकताच मैदानात परतला आहे.

हा अष्टपैलू खेळाडू जागतिक क्रिकेटवर राज्य करणार!

कॅमेरुन ग्रीनने स्वत:ला तंदुरुस्त ठेवल्यास तो दीर्घकाळ जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून राहील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार किम ह्युजेस याने व्यक्त केला आहे.

अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ग्रीन (Cameron Green) ने भारताविरुद्ध कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

ह्यूजने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, 'मी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणत आहे की, जर त्याने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले तर, तो दीर्घकाळ जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू राहील. मला यात शंका नाही.'

कॅमेरुन ग्रीनच्या खेळावर असे सांगितले

किम ह्युजेस कॅमेरॉन ग्रीनच्या कारकिर्दीचा मागोवा घेत आहे. ह्युजेस म्हणाला की, 'त्याची गोलंदाजी अतिशय सोपी आहे, आणि मला एकदिवसीय अष्टपैलू खेळाडू म्हणायचे नाही.

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये काही खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करु शकतात, परंतु तो फक्त एक फलंदाज म्हणून जगातील कोणत्याही संघात स्थान निर्माण करण्यास सक्षम आहे.'

पहिल्या डावात 114 धावा केल्या

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे कॅमेरुन ग्रीन संघाचा भाग बनला नाही. त्याचवेळी, तिसऱ्या सामन्यातही त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, परंतु अहमदाबाद (Ahmedabad) कसोटीच्या पहिल्या डावात त्याने चमकदार कामगिरी केली. कॅमेरुन ग्रीनने 170 चेंडूत 114 धावा केल्या. या खेळीत त्याने 18 चौकारही मारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT