Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 'हे' 5 धाकड ठरले टीम इंडियाच्या विजयाचे हिरो, ऑस्ट्रेलियन संघाचे उडवले होश

IND vs AUS 1st ODI Match: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 1st ODI Match: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 188 धावा केल्या. टीम इंडियाने 189 धावांचे लक्ष्य 5 विकेट गमावूनच पूर्ण केले. या सामन्यात 5 खेळाडू टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो केएल राहुल ठरला. या सामन्यात केएल राहुलने शानदार कामगिरी केली.

तसेच, मोहम्मद शमी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीसह मोहम्मद शमीने अचूक लाईन लेन्थने कांगारुंना प्रचंड त्रास दिला. या सामन्यात 6 षटके टाकताना मोहम्मद शमीने केवळ 17 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. या सामन्यात मोहम्मद शमीची इकॉनमी केवळ 2.83 इतकी होती.

दुसरीकडे, टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजानेही या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. पहिल्यांदा गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने 9 षटकांत 46 धावा देत 2 बळी घेतले. त्याचबरोबर जडेजाने नाबाद 45 धावांची खेळी खेळली.

मोहम्मद शमीशिवाय मोहम्मद सिराजनेही या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. 5.4 षटके टाकताना मोहम्मद सिराजने 29 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले.

त्याचबरोबर, या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेल्या हार्दिक पांड्यानेही शानदार कामगिरी केली. पांड्याने या सामन्यात 5 षटके टाकली आणि 29 धावांत एक विकेट घेतली. त्याचवेळी हार्दिक पांड्यानेही 31 चेंडूत 25 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT