Pat Cummins & Mitchell Starc Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA: वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार! दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनी पराभव

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना भारतीय संघाशी होणार आहे. बुधवारी न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

ऑस्ट्रेलियाने 8व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या शतकाच्या जोरावर 49.4 षटकात सर्व गडी गमावून 212 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये 60 धावांची भागीदारी झाली. यानंतर मिचेल मार्श लवकर बाद झाला. स्मिथ आणि हेडने डाव सांभाळला पण हेडची विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि सामना रोमांचकारी स्थितीत नेला. ऑस्ट्रेलिया संघाने 47.2 षटकात 7 विकेट गमावत 215 धावा करत सामना जिंकला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या उपांत्य फेरीत डेव्हिड मिलरच्या शतकाच्या जोरावर 49.4 षटकांत सर्व गडी गमावून 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 18 चेंडूत 29 धावा करुन बाद झाला.

डुसेनने मिचेल मार्शचा उत्कृष्ट झेल घेतला. हेड 62 धावा करुन बाद झाला. मार्नस लॅब्युशेनने 18 आणि मॅक्सवेलने 1 धावा काढल्या. स्टीव्ह स्मिथ 62 चेंडूत 30 धावा करुन बाद झाला. जोश इंग्लिशने 28 धावा केल्या. यानंतर कमिन्स आणि स्टार्क यांनी आठव्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स

पहिली विकेट: डेव्हिड वॉर्नर (29), विकेट- एडन मार्कराम (1-60)

दुसरी विकेट: मिचेल मार्श (0), विकेट- कगिसो रबाडा (2-61)

तिसरी विकेट: ट्रॅव्हिस हेड (62), विकेट- केशव महाराज (3-106)

चौथी विकेट: मार्नस लॅबुशेन (18), विकेट- तबरेझ शम्सी (4-133)

पाचवी विकेट: ग्लेन मॅक्सवेल (1), विकेट- तबरेझ शम्सी (5-137)

सहावी विकेट: स्टीव्ह स्मिथ (30), विकेट- जेराल्ड कोएत्झी (6-174)

सातवी विकेट: जोश इंग्लिस (28), विकेट- जेराल्ड कोएत्झी (7-193)

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) डेव्हिड मिलरने सर्वाधिक 101 धावा केल्या. हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्यात पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी झाली. यानंतर आफ्रिकन संघाचा डाव गडगडला तरीही 200 च्या पुढे जाऊ शकला.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने 3-3, जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने 2-2 विकेट घेतल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला शून्यावर बाद केले.

त्यानंतर हेझलवूडने फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार्कला एडन मार्करामची विकेट मिळाली आणि हेझलवूडला रॅसी व्हॅन डर डुसेनची दुसरी विकेट मिळाली. यानंतर क्लासेन आणि मिलरने डावाची धुरा सांभाळली.

दोघांमध्ये 95 धावांची भागीदारी झाली होती. क्लासेन 48 चेंडूत 47 धावा करुन बाद झाला. पुढच्याच चेंडूवर मार्को यान्सेनही पॅव्हेलियनमध्ये परतला. जेराल्ड कोएत्झी आणि मिलर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. जेराल्ड 19 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

डेव्हिड मिलरने 116 चेंडूत 101 धावा केल्या. रबाडा आणि शम्सी यांनी अखेरच्या विकेटसाठी सात धावांची भागीदारी केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स

पहिली विकेट: टेम्बा बावुमा (0), विकेट-मिचेल स्टार्क (1-1)

दुसरी विकेट: क्विंटन डी कॉक (3), विकेट- जोश हेझलवूड (2-8)

तिसरी विकेट: एडन मार्कराम (10), विकेट- मिचेल स्टार्क (3-22)

चौथी विकेट: रॅसी व्हॅन डर ड्युसेन (6), विकेट- जोश हेझलवूड (4-24)

पाचवी विकेट: हेन्रिच क्लासेन (47), विकेट- ट्रॅव्हिस हेड (5-119)

सहावी विकेट: मार्को यान्सेन (0), विकेट- मार्को जॅनसेन (6-119)

सातवी विकेट: जेराल्ड कोएत्झी (19), विकेट- पॅट कमिन्स (7-172)

आठवी विकेट: केशव महाराज (4), विकेट- मिचेल स्टार्क (8-191)

नववी विकेट: डेव्हिड मिलर (101), विकेट- पॅट कमिन्स (9-201)

दहावी विकेट: कगिसो रबाडा (10), विकेट- पॅट कमिन्स (10-212)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT