New Zealand  Dainik Gomantak
क्रीडा

World Test Championship: न्यूझीलंडचा श्रीलंकेला व्हाईटवॉश अन् WTC पाँइंट्सटेबल कन्फर्म! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

न्यूझीलंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम गुणतालिका निश्चित झाली आहे.

Pranali Kodre

ICC World Test Championship 2021-2023 Standing: न्यूझीलंड क्रिकेट संघाने श्रीलंकेला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सोमवारी एक डाव आणि 58 धावांनी पराभूत केले.

याबरोबरच न्यूझीलंडने ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला. या मालिकेबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या साखळी फेरीचा कालावधी संपला आहे.

त्यामुळे आता या स्पर्धेची अंतिम गुणतालिकाही निश्चित झाली आहे. या गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी यापूर्वीच पहिल्या दोन क्रमांकावर स्थान निश्चित करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

त्यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडेल.

या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 66.67 च्या विजयी टक्केवारीसह अव्वल क्रमांकावर आहे, तर भारत 58.8 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तसेच न्यूझीलंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत पराभूत केल्याने त्यांना फायदा झाला असून ते गुणतालिकेत आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची या स्पर्धेतील 38.46 इतकी अंतिम विजयी टक्केवारी राहिली. मात्र न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचे स्थान खालावले.

पाकिस्तान 38.1 विजयी टक्केवारीसह सातव्या आणि वेस्ट इंडिज 34.62 विजयी टक्केवारीसह आठव्या क्रमांकावर घसरले. या गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर बांगलादेश असून त्यांची 11.11 इतकीच विजयी टक्केवारी राहिली.

दरम्यान, या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यापाठोपाठ 55.56 च्या विजयी टक्केवारीसह दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर इंग्लंड 46.97 विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर राहिले.

श्रीलंकेलाही या पराभवाचा मोठा फटका बसला. त्यांना अंतिम सामन्यात जाण्याची संधी तर गमवावी लागलीच, पण ते या गुणतालिकेतही तिसऱ्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर घसरले. त्यांची अंतिम विजयी टक्केवारी 44.44 राहिली.

WTC 2021-2023

अशी खेळवली जाते स्पर्धा

नऊ संघात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे प्रत्येक दोन वर्षांच्या कालावधीत एक पर्व खेळवले जाते. 2021-23 या दरम्यान या स्पर्धेचे दुसरे पर्व खेळवण्यात आले. सहभागी 9 संघांना या स्पर्धेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत 3 मायदेशात आणि 3 परदेशात कसोटी मालिका खेळायच्या असतात.

या मालिकांमधील सामन्यांच्या निकालांवरून विजयाच्या टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित होते. त्यानुसार गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT