Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Team 2022 मध्येही भारतीय क्रिकेटर्सचेच वर्चस्व! 5 खेळाडूंना मिळाली संधी, हरमनप्रीत कर्णधार

आयसीसी वनडे 2022 संघांमध्ये श्रेयस, हरमनप्रीतसह एकूण 5 भारतीय खेळाडूंना संधी मिळाली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Teams of the Year for 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी 2022 वर्षातील सर्वोत्तम महिला आणि पुरूष वनडे संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघात मिळून भारताच्या एकूण 5 खेळाडूंना संधी मिळाली आहे. साल 2022 वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विविध राष्ट्रीय संघातील खेळडूंना या संघात संधी दिली जाते.

आयसीसीच्या 2022 पुरूष वनडे संघात श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांना, तर महिला वनडे संघात स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि रेणूका सिंग या भारतीय खेळाडूंना संधी मिळाली आहे.

आयसीसी पुरूष वनडे संघ 2022

आयसीसीने 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष वनडे संघात 7 राष्ट्रीय संघातील खेळाडूंना संधी दिली आहे. या संघात भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघातील प्रत्येकी 2 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्येकी एका खेळाडूला संधी मिळाली आहे.

या संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे सोपवण्यात आले आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा समावेश आहे. लॅथम व्यतिरिक्त ट्रेंट बोल्टही या संघाचा भाग आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड आणि ऍडम झम्पा यांना संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिजचे अल्झारी जोसेफ आणि शाय होप, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, बांगलादेशचा मेहदी हसन मिराज यांनाही या संघात संधी मिळाली आहे.

आयसीसीच्या या वनडे संघात संधी मिळालेल्या भारताच्या श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची कामगिरी शानदार झाली होती. श्रेयसने 2022 वर्षात भारताकडून सर्वाधिक वनडे धावा केल्या होत्या. त्याने या वर्षात 17 वनडे सामने खेळताना 55.69 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 1 शतकाचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच सिराजने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळताना 2022 वर्षात भारताकडून 15 वनडे सामने खेळताना सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या.

आयसीसी पुरूष वनडे संघ 2022: बाबर आझम (कर्णधार), ट्रेविस हेड, शाय होप, श्रेयस अय्यर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, मेहदी हसन मिराज, अल्झारी जोसेप, मोहम्मद सिराज, ट्रेंट बोल्ट,ऍडम झम्पा.

आयसीसी महिला वनडे संघ 2022

आयसीसीने 2022 वर्षातील सर्वोत्तम महिला वनडे संघात भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड, आयाबोंगा खाका आणि शबानेम इस्माईल या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली आणि बेथ मुनी या संघात आहे. हेलीकडे यष्टीरक्षणाचीही जबाबदारी आहे.

या वनडे संघाचे कर्णधारपद भारताच्या हरमनप्रीतकडे सोपवण्यात आले आहे. इंग्लंडच्या नॅट सायव्हर आणि सोफी एक्लेस्टोन यांना, तसेच न्यूझीलंडची एमेलिया केर हिला देखील या संघात संधी मिळाली आहे.

आयसीसीच्या या वनडे संघात संधी मिळालेल्या मानधना, हरमनप्रीत आणि रेणूका या भारतीय खेळाडूंची कामगिरी वर्षभरात चांगली झालेली आहे.

मानधनाने 2022 वर्षात 15 वनडे सामन्यांत 49.71 च्या सरासरीने 696 धावा केल्या होत्या. यामध्ये तिच्या एका शतकाचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच हरमनप्रीत कौरने 17 सामन्यांत 58 च्या सरासरीने 754 धावा केल्या. यादरम्यान तिने 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली.

तसेच रेणूकाने 2022 वर्षात केवळ 7 वनडे सामन्यांतच 18 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. 28 धावात 4 विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली, तर तिने एकूण 3 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

आयसीसी महिला वनडे संघ 2022 - एलिसा हेली (यष्टीरक्षक), स्मृती मानधना, लॉरा वोल्वार्ड, नॅट सायव्हर, बेथ मूनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), एमेलिया केर, सोफी एक्लेस्टोन, आयाबोंगा खाका, रेणूका सिंग, शबानेम इस्माईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT