India vs New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: कर्णधार रोहितने जिंकला टॉस! भारत-न्यूझीलंडची अशी आहे 'प्लेइंग-11'

India vs New Zealand Semi-Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेता पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघात खेळवला जात आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 India vs New Zealand:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांनी त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात खेळवलेलेच 11 खेळाडू या सामन्यासाठीही कायम केले आहेत.

उपांत्य सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

तसेच दरम्यान, वनडे वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत आमने-सामने आले आहेत. यापूर्वी 2019 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांमध्ये उपांत्य सामना झाला होता, ज्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटेनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT