Rohit Sharma BCCI
क्रीडा

Rohit Sharma: टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! रोहित ODI क्रिकेटमध्ये 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सामना खेळताना 4 षटकार मारत रोहित शर्माने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Rohit Sharma Sixes Record:

रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकपमधील सामना पार पडला. धरमशाला येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने 4 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहितने शुभमन गिलच्या साथीने चांगली सुरुवात दिली होती. त्याने या सामन्यात 46 धावा केल्या. ही खेळी त्याने 40 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह केली.

त्यामुळे रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 2023 वर्षात 50 षटकार मारण्याचा टप्पा पार केला आहे. तो एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 50 षटकार मारणारा जगातील तिसरा, तर भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितच्या आता 2023 वर्षात 21 सामन्यांमध्ये 53 षटकार झाले आहेत.

त्याच्याआधी वनडेत एका वर्षात 50 हून अधिक षटकार ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनी केला आहे. गेलने 2019 वर्षात 56 षटकार मारले होते, तर एबी डिविलियर्सने 2015 साली 58 षटकार मारले आहेत.

दरम्यान, आता रोहित एका वर्षात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू होण्यासाठी अवघ्या 6 षटकारांची गरज आहे. त्याने 6 षटकार यावर्षी मारले, तर तो डिविलियर्सला मागे टाकेल.

वर्ल्डकपमध्ये डिविलियर्सला टाकले मागे

वनडे वर्ल्डकपमध्ये मात्र सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने डिविलियर्सला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. रोहितचे आता वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात 40 षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने डिविलियर्सच्या 37 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर 49 षटकारांसह ख्रिस गेल आहे.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

    • 49 षटकार - ख्रिस गेल

    • 40 षटकार - रोहित शर्मा

    • 37 षटकार - एबी डिविलियर्स

    • 31 षटकार - रिकी पाँटिंग

    • 29 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम

दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने न्यूझीलंडने दिलेले 274 धावांचे आव्हान 48 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT