Team India BCCI
क्रीडा

World Cup 2023 Video: न्यूझीलंडविरुद्ध शमीने पटकवला 'मॅन ऑफ द मॅच', पाहा कशा घेतल्या 5 विकेट्स

Mohammad Shami Video: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळताना शमीने ५ विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Mohammad Shami 5 Wickets Video:

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (22 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यातील भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मोठा वाटा उचलला.

दरम्यान, भारताचा हा या स्पर्धेतील पाचवा सामना होता. या स्पर्धेतील पहिल्या चारही सामन्यात शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण न्यूझीलंडविरुद्ध त्याला संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोने करत या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही पटकावला.

त्याने या सामन्यात टाकलेल्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. यावेळी 9 व्या षटकात भारताचा कर्णधार रोहितने शमीकडे चेंडू सोपवला. त्यानेही या षटकातील पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगचा त्रिफळा उडवत त्याला 17 धावांवर माघारी धाडले.

त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल यांची 159 धावांची भागीदारी तोडण्याची मोठा कामगिरीही शमीनेच पार पाडली. भारतासाठी रचिन आणि मिचेल यांची जोडी डोकेदुखी ठरत असतानाच शमीने 34 व्या षटकात रचिनला चूक करण्यात भाग पाडले. त्याचा झेल शुभमन गिलने घेतला. या विकेटने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

यानंतर न्यूझीलंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. शमीने 48 व्या षटकात सलग दोन चेंडूवर 2 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या धावगतीला अखेरच्या षटकांमध्ये लगाम घातला. तसेच त्याने अखेरच्या षटकात शतकवीर मिचेलची विकेट घेत 5 विकेट्स पूर्ण केल्या. 130 धावा केलेल्या मिचेलचा झेल विराट कोहलीने घेतला.

शमीने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करत 54 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने आपली संघात कायम राहण्याची दावेदारीही मजबूत केली आहे.

तसेच तो वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीची बरोबरी केली आहे. आफ्रिदीनेही या वर्ल्डकपमध्ये 54 धावांत 5 विकेट्स अशी कामगिरी नोंदवलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT