Mohammad Shami BCCI
क्रीडा

World Cup 2023: शमीचं ऐतिहासिक विकेट्सचं पंचक! 'हा' कारनामा करणारा बनला पहिलाच भारतीय गोलंदाज

Mohammad Shami: मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप 2023 मधील सामन्यात 5 विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Mohammad Shami 5 Wickets Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना होत आहे. धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होत असून न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून या सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेत काही विक्रमही केले.

शमीने विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिचेल, मिचेल सँटेनर आणि मॅट हेन्री यांच्या विकेट्स घेतल्या. शमीने 10 षटके गोलंदाजी करताना 54 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

त्यामुळे आता शमी भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या आता वर्ल्डकपमध्ये 36 विकेट्स झाल्या आहेत.

शमीने अनिल कुंबळेच्या 31 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर संयुक्तरित्या झहिर खान आणि जवागल श्रीनाथ आहे. या दोघांनीही प्रत्येकी 44 विकेट्स घेतल्या आहेत.

  • भारतासाठी वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज -

    • 44 विकेट्स - झहिर खान

    • 44 विकेट्स - जवागल श्रीनाथ

    • 36 विकेट्स - मोहम्मद शमी*

    • 31 विकेट्स - अनिल कुंबळे

कपिल देवलाही पछाडलं

शमीने वनडे वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. यापूर्वी त्याने 2019 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंगघममध्ये 69 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपमध्ये एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा दोनदा करणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कपिल देव, वेंकटेश प्रसाद, रॉबिन सिंग, आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी एकवेळा असा कारनामा केला आहे.

त्याचबरोबर वनडे वर्ल्डकपमध्ये शमीने पाचव्यांदा एकाच सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे हा विक्रम करणाराही तो पहिलाच भारतीय ठरला आहे. त्याने याबाबत इम्रान ताहीरची बरोबरी केली आहे. ताहीरनेही वनडे वर्ल्डकपमध्ये 5 वेळा चारहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

वर्ल्डकप 2023 मध्येही सर्वोत्तम कामगिरी

दरम्यान, शमी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीची बरोबरी केली आहे. आफ्रिदीनेही या वर्ल्डकपमध्ये 54 धावांत 5 विकेट्स अशी कामगिरी नोंदवलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT