Best Fielder Medal | India vs Australia | World Cup 2023 Final BCCI
क्रीडा

दु:खात सुखाचा क्षण! फायनलनंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पार पडला शेवटचा 'Best Fielder' सोहळा

Team India Video: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या फायनलनंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये अखेरच्या वेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यात आले.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Best Fielder Medal:

रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप विजयाला गवसणी घातली.

दरम्यान, या पराभवानंतर भारतीय संघ निराश झाला होता. पण या निराशेत एक छोटा आनंद देणारा क्षण होता, तो म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये दिले जाणारे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक. रविवारीच्या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक विराट कोहलीला मिळाले.

खरंतर सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देण्याची परंपरा या वर्ल्डकपमध्ये सुरू करण्यात आली होती.

प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची निवड क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून केली जात होती. तसेच प्रत्येक सामन्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने विजेत्या क्षेत्ररक्षकाची घोषणा केली जात होती. या पदक सोहळ्याला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला होता.

रविवारी देखील हे पदक अखेरच्या वेळी देण्यात आले. पण यावेळी नेहमीप्रमाणे कल्ला नव्हता, तर निराशेच्या गर्तेत आलेला एक चांगला क्षण होता. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'आमच्या पहिल्या ते शेवटच्या पदक सोहळ्यापर्यंत. सर्व चाहत्यांचे आभार, ज्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले. काल आम्ही ड्रेसिंग रुममध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अखेरच्या वेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक दिले.'

या व्हिडिओमध्ये दिसते की सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये निराश बसले आहेत. त्यावेळी टी दिलीप यांनी म्हटले की निराशा आहे, पण सर्वांनी केलेल्या कामगिरीचे अभिमान वाटत आहे.' तसेच त्यांनी त्यानंतर विराट कोहलीचे कौतुक केले आणि त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषित केले.

यानंतर उपांत्य फेरीतील सामन्यानंतर हे पदक जिंकलेल्या रविंद्र जडेजाने विराटच्या गळ्यात पदक घातले. विशेष म्हणजे या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच चेन्नईला झालेल्या पहिल्या सामन्यानंतरही विराटनेच हे पदक पटकावले होते आणि अखेरच्या सामन्यातही त्यानेच हे पदक जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT