India vs Australia | World Cup 2023 Final ICC
क्रीडा

World Cup 2023 Final: पॅट कमिन्सने जिंकला टॉस! अशी आहे भारत - ऑस्ट्रेलियाची 'प्लेइंग-11'

India vs Australia: वर्ल्डकप २०२३ फायनलसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023 Final, India vs Australia, Playing XI:

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) होत आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर म्हटले आहे की भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करायची होती. आता ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठीच उतरणार आहे.

या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांत उपांत्य फेरीत खेळलेले 11 खेळाडूच अंतिम सामन्यातही खेळताना दिसणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ २० वर्षांनी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. यापूर्वी २००३ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने १२५ धावांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, भारत चौथ्यांदा आणि ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

भारताने यापूर्वी 1983, 2003 आणि 2011 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे, त्यातील 1983 आणि 2011 साली विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

अशी आहे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झम्पा, जोश हेझलवुड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT