ICC Rule for Transgender Players Dainik Gomantak
क्रीडा

ICC ने घेतला मोठा निर्णय, आता ट्रान्सजेंडर खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट!

ICC Rule for Transgender Players: आयसीसीने (ICC) ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

ICC Rule for Transgender Players: आयसीसीने (ICC) ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ICC ने मंगळवारी ट्रान्सजेंडर खेळाडूंना आणि ज्यांनी लिंग परिवर्ताबाबत उपचार घेतले आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय खेळासाठी लिंग बदलाबाबत नवीन नियमांना आयसीसी बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता कोणताही पुरुष खेळाडू लिंग बदलून महिला क्रिकेट (Cricket) संघात खेळू शकणार नाही. 9 महिन्यांच्या प्रदिर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी का घालण्यात आली?

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटची अखंडता आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेत असल्याचे आयसीसीने म्हटले आहे. क्रिकेटच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ICC ने ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंवर ही बंदी घातली. डॉ. पीटर हार्कोर्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीने हा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने मंगळवारी एक प्रेस नोट जारी करताना ही माहिती दिली आहे. आयसीसीने सांगितले की, या नियमांचे दोन वर्षांत पुनरावलोकन केले जाईल. अशा परिस्थितीत, आता स्पष्टपणे सांगायचे तर, जे खेळाडू पूर्वी लिंग बदलून क्रिकेट संघाचा भाग बनले होते, ते आता असे करु शकणार नाहीत. आयसीसीच्या या नियमाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता आयसीसीच्या या नियमाचे काय परिणाम होतात हे पाहायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT