T20 World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022 संबंधी मोठी घोषणा, ग्रुप अन् शेड्यूल झाले फायनल

T20 World Cup: आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजसह झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

दैनिक गोमन्तक

ICC Mens T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या फेरीसाठी आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजसह झिम्बाब्वे पात्र ठरले आहेत. झिम्बाब्वेने नेदरलँड्सला हरवून ब गटात स्थान मिळवले. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच ICC मेन्स T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे.

दरम्यान,ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सात शहरांमध्ये आयोजित केली जाईल. जिलॉन्ग आणि होबार्ट पहिल्या फेरीचे आयोजन करतील. या मेगा इव्हेंटसाठी ग्रुप आणि शेड्यूल फायनल करण्यात आले आहे.

तसेच, अ गटात नामिबिया, श्रीलंका (Sri Lanka), यूएई आणि नेदरलँडला स्थान मिळाले आहे, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज (West Indies) आणि झिम्बाब्वे यांना संधी मिळाली आहे. गट 1 बद्दल बोलायचे झाल्यास, त्यात अफगाणिस्तान (Afghanistan), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व्यतिरिक्त गट अ चा विजेता आणि गट ब चा उपविजेता संघ असेल.

त्याचवेळी, गट 2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या गटात अ गटातील उपविजेता संघ आणि ब गटातील विजेता संघाचा समावेश असेल. अशा प्रकारे, पहिल्या फेरीत 8 संघ असतील, तर दुसऱ्या फेरीत 12 संघ असतील, जे सुपर 12 विरुद्ध खेळतील.

अ गट: नामिबिया, श्रीलंका, यूएई आणि नेदरलँड

ब गट: आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे

गट 1: अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, गट अ विजेता आणि गट ब उपविजेता

गट 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, गट अ उपविजेता आणि गट ब विजेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT