India vs Australia | WTC Final 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final खेळणारे भारत - ऑस्ट्रेलियाच नाही, तर 'हे' 9 संघही होणार मालामाल! ICC ची बक्षीस रकमेबाबत घोषणा

ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Prize money for WTC 2021-23: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 ही स्पर्धा गेले दोन वर्षे सुरू होती. आता या स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडेल. यासह या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सांगता होईल.

त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे. आयसीसीने घोषीत केल्याप्रमाणे स्पर्धेतील सहभागी 9 संघांमध्ये 3.8 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम वाटून दिली जाईल.

कोणाला किती मिळणार बक्षीस?

या स्पर्धेच्या पहिल्या पर्वासाठीही (2019-21) 3.8 मिलियन डॉलर एवढीच बक्षीस रक्कम होती. यात यावेळी बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावेळीही विजेच्या संघाला 1.6 मिलियन डॉलर बक्षीस म्हणून देण्यात येतील. तसेच उपविजेत्या संघाला 800,000 डॉलर बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियासह अन्य सर्व संघांच्याही बक्षीसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली आहे. या स्पर्धेत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला 450,000 डॉलर बक्षीस दिले जाणार आहे. तसेच चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडला 350,000 डॉलर बक्षीस म्हणून मिळतील.

याशिवाय या स्पर्धेत चांगला खेळ करत शेवटपर्यंत अंतिम सामन्यासाठी दावेदारी ठोकलेल्या श्रीलंका संघाला 200,000 डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. श्रीलंका गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिले होते.

तसेच न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी 100,000 डॉलर बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला 6 ते 9 क्रमांकावर राहणाऱ्या संघापेक्षा तब्बल 8 पटीने अधिक बक्षीस मिळणार आहे. म्हणजेच भारत किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोणताही संघ जरी अंतिम सामन्यात पराभूत झाला, तरी न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यापेक्षा 8 पटीने अधिक बक्षीस घेऊन जाणार आहे.

अशी खेळवली जाते स्पर्धा

नऊ संघात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचे प्रत्येक दोन वर्षांच्या कालावधीत एक पर्व खेळवले जाते. 2021-23 या दरम्यान या स्पर्धेचे दुसरे पर्व खेळवण्यात आले. सहभागी 9 संघांना या स्पर्धेअंतर्गत 2 वर्षांच्या कालावधीत 3 मायदेशात आणि 3 परदेशात कसोटी मालिका खेळायच्या असतात.

या मालिकांमधील सामन्यांच्या निकालांवरून विजयाच्या टक्केवारीनुसार गुणतालिकेत संघांची क्रमवारी निश्चित होते. त्यानुसार गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर राहणारे संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT