आय-लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी गोकुळम केरळा व चर्चिल ब्रदर्स यांच्यातील सामन्याचा क्षण. Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: चर्चिल ब्रदर्सची गोकुळम केरळाशी बरोबरी

दोन्ही संघांना मिळाला प्रत्येकी एक गुण

किशोर पेटकर

I-League Football: सामन्याच्या उत्तरार्धात नोंदविलेल्या पेनल्टी फटक्यावरील गोलमुळे गोकुळम केरळा संघाने गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले आणि आय-लीग फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी एक गुण विभागून घेतला. सामना रविवारी केरळमधील कोझिकोड येथे झाला.

रिचर्ड कॉस्ता याने 37 व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्स संघ आघाडीवर होता. पेनल्टी फटक्यावर 73 व्या मिनिटास आलेक्स सांचेझ याने अचूक नेम साधला व यजमान संघाने पिछाडी भरून काढली.

गोकुळम केरळाची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे आता सहा लढतीतून 11 गुण झाले आहेत. चर्चिल ब्रदर्सचीही स्पर्धेतील दुसरी बरोबरी असून त्यांचे सहा सामन्यानंतर आठ गुण झाले आहेत. त्यांचा पुढील सामना एक डिसेंबर रोजी दिल्ली एफसीविरुद्ध होईल.

उरुग्वेचा खेळाडू मार्टिन चावेस याने 35 यार्डावरून मारलेल्या अफलातून फ्रीकिक फटक्यावर गोकुळम केरळाचा गोलरक्षक देवांश दबास गडबडला. त्याचा लाभ उठवत रिचर्ड कॉस्ताने चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली.

नंतर दुखापतीमुळे रुग्णवाहिकेतून देवांश याला इस्पितळात न्यावे लागले आणि त्याची जागा बदली गोलरक्षक अविलाश पॉल याने घेतली.

सामन्यातील 17 मिनिटे बाकी असताना चर्चिल ब्रदर्सच्या बचावपटूने चेंडू हाताळल्यामुळे गोकुळम केरळला पेनल्टी फटक्याचा लाभ झाला आणि स्पॅनिश आघाडीपटू सांचेझने अचूक नेम साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT