Hyderabad FC Dainik Gomantak
क्रीडा

हैदराबादचे आयएसएल अग्रस्थान अबाधित

सुनील छेत्रीच्या विक्रमी पन्नासाव्या गोलनंतरही बंगळूर पराभूत

दैनिक गोमन्तक

पणजी ः हैदराबाद एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेत अग्रस्थान अबाधित राखताना शुक्रवारी माजी विजेत्या बंगळूर एफसीला 2-1 फरकाने हरवले. भारताचा यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्री याने स्पर्धेच्या इतिहासात सर्वप्रथम पन्नास गोल नोंदविण्याचा पराक्रम साधला, पण संघाचा पराभव टाळू शकला नाही. विजयामुळे हैदराबादने आता अव्वल स्थानी चार गुणांची आघाडी प्राप्त केली आहे.

बांबोळी (Bambolim)येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या पूर्वार्धात हैदराबादने दोन्ही गोल केले. स्पॅनिश हावियर सिव्हेरिया याने 16व्या, तर ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने 30व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या 87व्या मिनिटास सुनील छेत्री याचा गोल मैलाचा दगड ठरला. आयएसएल स्पर्धेत सर्वप्रथम 50 गोल नोंदविण्याचा मान 37 वर्षीय भारतीय आघाडीपटूने मिळविला. त्यामुळे बंगळूरला सामन्यात पिछाडी 1-2 अशी कमी करता आली. 

छेत्रीने मोसमातील 16 सामन्यांत तीन, तर आयएसएलमध्ये (ISL) एकंदरीत 110 सामन्यांत 50 गोल केले आहेत. हैदराबादचा नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे 49 गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला शुक्रवारच्या लढतीत गोल नोंदविता आला नाही.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादचा हा 16 सामन्यांतील आठवा विजय ठरला. त्यांचे सर्वाधिक 29 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीवर (25) चार गुणांची आघाडी घेतली आहे. मागील लढतीत एटीके मोहन बागानकडून हार पत्करलेल्या हैदराबादने शुक्रवारी पूर्ण तीन गुण निसटू दिले नाही. नऊ सामने अपराजित राहिलेल्या मार्को पेझ्झायोली यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरला स्पर्धेतील पाचवा पराभव पत्करावा लागला. 16 लढतीनंतर त्यांचे 23 गुण आणि तिसरा क्रमांक कायम राहिला.

हैदराबादच्या (Hyderabad) रोहित दानूच्या पासवर बार्थोलोम्यू ओगबेचे याला चेंडू मिळणार नाही याची दक्षता बंगळूरच्या रोशन नाओरेम याने घेतली, पण त्यावेळी गोलक्षेत्रात मोकळा असलेल्या सिव्हेरियो याने संधी साधली. बंगळूरच्या दोघा खेळाडूंना मागे टाकत त्याने सणसणीत फटक्यावर गोलची नोंद केली. यावेळी गोलरक्षक गुरप्रीत संधू डावीकडे झेपावला, पण चेंडू अडवू शकला नाही. यावेळी बंगळूरला बचावपटूंचा निष्काळजीपणा भोवला. नंतर सौविक चक्रवर्तीच्या फ्रीकिक फटक्यावर जुवाव व्हिक्टरने चेंडूवर ताबा राखत वेगवान फटका मारला. गोलरक्षक गुरप्रीत झेपावला, पण चेंडू त्यापूर्वी गोलनेटमध्ये गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT