Bartholomew Ogbe
Bartholomew Ogbe Dainik Gomantak
क्रीडा

हैदराबादने जमशेदपूरला बरोबरीत रोखले !

दैनिक गोमन्तक

पणजी: अनुभवी बार्थोलोमेव ओगबेचे (Bartholomew Ogbe) याने उत्तरार्धात केलेल्या गोलमुळे हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात गुरुवारी जमशेदपूर एफसीला 1-1 गोलबरोबरीत रोखले. सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला.

स्कॉटलंडचा 31 वर्षीय ग्रेग स्टुअर्ट याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदविताना जमशेदपूरला 41व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 37 वर्षीय नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोमेव ओगबेचे याने मोसमातील दुसरा गोल करत हैदराबादला 56व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. चौथा आयएसएम मोसम खेळणाऱ्या ओगबेचे याचा हा 60 सामन्यांतील 37वा गोल ठरला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादी तो आता तिसऱ्या स्थानी आहे.

बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. जमशेदपूरचे आता तीन लढतीनंतर पाच गुण झाले आहेत. त्यांची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. हैदराबादने मागील लढतीत मुंबई सिटीला धक्का दिला होता. आज त्यांना तसा धडाकेबाज खेळ करता आला नाही. त्यांची ही पहिलीच बरोबरी ठरली. तीन लढतीनंतर त्यांचे चार गुण झाले आहेत.

सामन्याच्या पूर्वार्धात जमशेदपूरचा वरचष्मा राहिला. तेराव्याच मिनिटास हुआनन याचा हेडर किचित हुकल्यामुळे ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडी घेता आली नाही. नंतर ग्रेग स्टुअर्ट याचा प्रयत्नही फोल ठरला. विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना स्टुअर्ट याचा उजव्या पायाचा अचूक ठरला आणि जमशेदपूरला आघाडीचे समाधान लाभले. विश्रांतीनंतर ओगबेचे याने आपला दर्जा सिद्ध केला. जुवाव व्हिक्टर याच्या असिस्टवर नायजेरियन खेळाडूने एली साबिया याला गुंगारा दिला, नंतर गोलरक्षक टीपी रेहेनेश यालाही चेंडू अडविण्याची संधी दिली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT