Hugh Admids Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2022: धक्कादायक घटना; Auctioneer स्टेजवरच पडले बेशुध्द (Video)

बंगळुरुमध्ये (Bangalore) सुरु असलेल्या आयपीएल 2022 मेगा लिलावाचे लिलावकर्ते ह्यू एडमीड्स यांची तब्येत अचानक बिघडली. लिलावादरम्यानच ते बेशुद्ध पडले.

दैनिक गोमन्तक

बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा लिलावाचे लिलावकर्ते ह्यू एडमीड्स यांची तब्येत अचानक बिघडली. लिलावादरम्यानच ते बेशुद्ध पडले. ह्यू एडमीड्स श्रीलंकेचे अष्टपैलू खेळाडू वनेंदू हसरंगावर (Vanendu Hasaranga) बोली लावत होते. त्याच दरम्यान ते स्टेजवरुन कोसळले. (Hugh Admids Auctioneer Of IPL 2022 Auction Suddenly Fell Ill)

दरम्यान, ह्यू एडमीड्स यांची प्रकृती खालावल्यामुळे लिलाव रद्द करण्यात आला आहे. ह्यू एडमिड्स हे जगातील प्रसिद्ध लिलाव ऑपरेटरपैकी एक आहेत. ते 2019 पासून आयपीएल लिलाव करत आहेत. त्यांनी 3 वर्षांपूर्वी रिचर्ड मॅडली (Richard Madley) यांची जागा घेतली होती.

तसेच, ह्यू एडमीड्स 60 वर्षांचे असून त्यांनी जगभरात 2700 हून अधिक लिलाव केले आहेत. पहिला लिलाव ह्यू एडमीड्स यांनी 1984 मध्ये आयोजित केला होता. ह्यू एडमीड्स यांनी ब्रिटीश ऑक्शन हाऊसमध्ये काम केले आहे. तिथे त्यांनी 3 लाखांपेक्षा अधिक वस्तूंचा लिलाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarmanas Ferry: सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस बनतोय धोकादायक; अपघातांचे सत्र सुरूच, उपाययोजना करण्याची मागणी

Goa Mango Price: आंबा पुन्‍हा 'भाव' खाऊ लागला! आवक घटली, मानकुराद 800 तर मांगेलाल 500 रुपये डझन

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रशासनाचा अ‍ॅक्शन मोड! कुजलेली फळे विकणाऱ्यांवर कडक कारवाई

Vaibhav Sooryavanshi: सामना लॉर्ड्सवर, पण चर्चा भारताच्या वैभवची! युवा खेळाडूच्या धडाकेबाज कामगिरीची होतेय चर्चा Watch Video

Goa Lake Pollution: गोव्याची जलसंपदा वाचेल का?

SCROLL FOR NEXT