HS Prannoy Dainik Gomantak
क्रीडा

HS Prannoy: वर्षाच्या अखेरीसही एचएस प्रणॉयसाठी आनंदाची बातमी! रँकिंगमध्ये घेतली गरुडझेप

एचएस प्रणॉयने जागतिक क्रमवारीत पुन्हा त्याचे सर्वोत्तम स्थान मिळवले आहे.

Pranali Kodre

Badminton World Ranking: भारताचा बॅडमिंटन स्टार एचएस प्रणॉय यांच्यासाठी 2022 वर्ष शानदार ठरले आहे. आता वर्षाच्या अखेरीस त्याला आणखी एक खुशखबर मिळाली आहे. त्याने जागतिक क्रमवारीत त्याचे सर्वोत्तम आठवे स्थान पुन्हा मिळवले आहे.

प्रणॉयने यापूर्वी 2018 साली जागतिक क्रमवारीत आठवे स्थान मिळवले होते. पण त्यानंतर तो त्याची क्रमवारी 30व्या स्थानावरूनही खाली घसरली होती. मात्र, आता त्याने 2022मध्ये चांगली कामगिरी करत पुन्हा अव्वल 10 जणांमध्ये स्थान पटकावले आहे.

त्याने याचवर्षी भारताला पहिल्यांदा थॉमस कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच तो यावर्षी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा खेळणाराही एकमेव भारतीय होता. या स्पर्धेत त्याला विजेतेपदापर्यंत पोहचता आले नव्हते, मात्र त्याने दिग्गज विक्टर ऍक्सेलसनविरुद्ध विजय मिळवला होता.

त्याला यावर्षात कोणतेही वैयक्तिक विजेतेपद जिंकता आलेले नसले तरी यावर्षी तो सात स्पर्धांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. तसेच दोन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. तसेच स्विस ओपनमध्ये तो उपविजेता ठरला होता.

(HS Prannoy regained his career-high ranking)

दरम्यान, त्याच्याशिवाय जागतिक क्रमवारी भारताचा लक्ष्य सेनही अव्वल १० जणांमध्ये स्थान टिकवून आहे. लक्ष्यने सातवे स्थान कायम केले आहे. तसेच किदांबी श्रीकांत मात्र एका स्थानाने खाली गेला असून आता तो 12 व्या क्रमांकावर आला आहे.

प्रणॉय याचवर्षी सप्टेंबरमध्ये टूर रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आला होता. त्याला नोव्हेंबर 2022 मध्ये अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

प्रणॉयसाठी 2022 वैयक्तिक आयुष्यातही अविस्मरणीय

प्रणॉय सप्टेंबर 2022 मध्ये विवाहबंधनात देखील अडकला आहे. त्याने केरळमध्ये श्वेता गोम्स हिच्याशी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यामुळे त्याच्यासाठी 2022 हे वर्ष सर्वच दृष्टीने अविस्मरणीय ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT