Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Harmanpreet Kaur Record: कॅप्टन्सी सोडल्यानंतर 'हरमन'चा भीम पराक्रम! स्मृती मंधानाचा मोडला रेकॉर्ड; मायदेशात अशी कामगिरी करणारी ठरली पहिली

Harmanpreet Kaur Made History: रायपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीतने अवघ्या 41 चेंडूंमध्ये नाबाद 91 धावांची विस्फोटक खेळी खेळली. तिच्या या जिगरबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने जिम्बाब्वेचा 92 रनच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Manish Jadhav

Harmanpreet Kaur Made History: भारतीय महिला क्रिकेट संघाने जिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका दमदार विजयासह आपल्या नावावर केली. मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताची अनुभवी आणि माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने तुफानी फलंदाजी करत क्रिकेटच्या पटलावर नवा इतिहास रचला. रायपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरमनप्रीतने अवघ्या 41 चेंडूंमध्ये नाबाद 91 धावांची विस्फोटक खेळी खेळली. तिच्या या जिगरबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने जिम्बाब्वेचा 92 रनच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

विशेष म्हणजे, या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर हरमनने विद्यमान कर्णधार स्मृती मंधानाचा (Smriti Mandhana) मोठा विक्रम मोडून भारतीय भूमीवर एका टी-20 डावात सर्वाधिक धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. मायदेशात भारतीय खेळाडूने केलेली सर्वोच्च टी20 आंतरराष्ट्रीय धावसंख्या 80 होती. स्मृतीने डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 80 धावा केल्या होत्या. हरमनप्रीतने आता तिचा हाच विक्रम मोडला. तिचे शतक हुकले असले तरी, तिने हा महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला.

दरम्यान, सामन्यात भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 216 धावांचा डोंगर उभा केला. हरमनप्रीत कौरच्या नाबाद 91 धावांव्यतिरिक्त शेफाली वर्मा हिने 69 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर अनुष्का शर्माने 28 धावांची खेळी खेळली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या जिम्बाब्वेच्या संघाची सुरुवात खराब झाली. क्रांती गौड आणि नंदनी शर्मा यांनी सुरुवातीलाच झटके देत जिम्बाब्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

जिम्बाब्वेकडून शार्ने मेयर्सने 60 आणि बिलव्ड बीजाने 44 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संपूर्ण संघाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 124 धावांपर्यंत मजल मारता आली, ज्यामुळे भारताने हा सामना 92 धावांनी सहज जिंकत मालिका आपल्या नावे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Rakhan Yatra: काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून काय साध्य झाले? 27 दिवसांच्या प्रवासानंतरही अनुत्तरित प्रश्न कायम

Edible Oil Price Hike: ऐन सणांच्या दिवसांत गृहिणींचे कोलमडणार बजेट! पाम ऑइलसह सर्व प्रकारची खाद्यतेले महागणार; खिशाला लागणार मोठी कात्री

Starlink Satellite Internet: प्रतीक्षा 'सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी'ची! गोव्यापासून 110 किमी आधीच स्टारलिंकचं इंटरनेट बंद

Goa Assembly Election: 'पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार'; दामू नाईकांच्या उमेदवारीबाबत चर्चांना पूर्णविराम

Health Centre Renovation: मडकई आरोग्य केंद्राचा चेहरामोहरा बदलणार! 30 कोटींच्या खर्चातून मिळणार अद्ययावत सुविधा

SCROLL FOR NEXT