Harbhajan Singh Sreesanth Dainik Gomantak
क्रीडा

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Harbhajan Singh Sreesanth Slapgate News: भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक असलेल्या 2008 च्या 'थप्पड कांड'ची जखम पुन्हा एकदा ताजी झाली.

Manish Jadhav

Harbhajan Singh Sreesanth Slapgate News: भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक असलेल्या 2008 च्या 'थप्पड कांड'ची जखम पुन्हा एकदा ताजी झाली. माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत यांच्यातील मैत्रीत आता मोठी दरी निर्माण झाली असून श्रीसंतने हरभजनला सोशल मीडियावर ब्लॉक केल्याचे उघड झाले. 18 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा हरभजन सिंह व्यावसायिक फायदा उचलत असून त्यातून लाखो-करोडोंची कमाई करत असल्याचा खळबळजनक आरोप श्रीसंतने केला.

'मातृभूमी'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत श्रीसंतने आपले मौन सोडले. त्याने सांगितले की, हरभजन सिंहने अलीकडेच 'थप्पड प्रकरणा'वर आधारित एक जाहिरात केली, जी अत्यंत आक्षेपार्ह होती. श्रीसंतच्या दाव्यानुसार, या एका जाहिरातीतून हरभजनने 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची कमाई केली. "आजवर मी हरभजनबद्दल कोणत्याही मुलाखतीत नकारात्मक बोललो नव्हतो, पण त्याने त्या वादाचा वापर करुन पैसे कमावले हे मला पटले नाही. विशेष म्हणजे, ही जाहिरात केल्यानंतर त्याने मला स्वतः फोन करुन या जाहिरातीची स्टोरी सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगितले, जे माझ्यासाठी धक्कादायक होते," असे श्रीसंतने स्पष्ट केले.

श्रीसंत पुढे म्हणाला की, "मी हरभजनला त्या घटनेसाठी माफ केले आहे, पण मी ती गोष्ट कधीच विसरणार नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट विसरलात, तर समोरची व्यक्ती तीच चूक पुन्हा करते आणि हरभजन त्याचे उत्तम उदाहरण आहे." एकेकाळी हरभजनला मोठा भाऊ मानणाऱ्या श्रीसंतने आता त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहेत. गेल्या एक-दोन महिन्यांत हरभजनच्या वागण्यात आलेला बदल आणि त्या जाहिरातीमुळे दुखावलेल्या श्रीसंतने त्याला इन्स्टाग्रामवरुन ब्लॉक केले. "माझ्या नजरेत त्याने नेहमीच नाटक केले आणि आता मला त्याची गरज उरलेली नाही," अशा कडक शब्दांत श्रीसंतने आपली नाराजी व्यक्त केली.

2008 च्या आयपीएल (IPL) हंगामात एका सामन्यानंतर हरभजनने मैदानात श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ तेव्हा तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेकदा या दोघांनी जाहीरपणे गळाभेट घेऊन वाद मिटल्याचे दाखवले होते. मात्र, आता 18 वर्षांनंतर जाहिरातीच्या पैशांवरुन आणि व्यावसायिक फायद्यावरुन या दोन दिग्गज खेळाडूंमधील मैत्रीचा अंत झाल्याचे चित्र दिसत आहे. या नव्या वादामुळे क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, हरभजन सिंह (Harbhajan Singh) यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT