Virat Kohli Century Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: विराट पुन्हा ठरला गुवाहाटीचा 'किंग'! रेकॉर्ड्स पाहून व्हाल थक्क

गुवाहाटी विराटसाठी लकी ठरताना दिसत आहे.

Pranali Kodre

Virat Kohli: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर वनडे मालिकेतील पहिला सामना मंगळवारी खेळवला गेला. या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्यामुळे विराटसाठी गुवाहाटी लकी ठरत असल्याचे दिसून आले.

विराटने या सामन्यात 87 चेंडूत 113 धावा केल्या. ही खेळी करताना 12 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73वे शतक आहे. दरम्यान, गुवाहाटीमध्ये केलेले हे त्याचे तिसरे वनडे शतक ठरले आहे.

(Virat Kohli 3rd ODI Century at Guwahati)

विराटने आत्तापर्यंत गुवाहाटीमध्ये तीन वनडे सामने खेळले आहेत. यातील दोन सामने त्याने गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर आणि एक सामना नेहरू स्टेडियमवर खेळला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात त्याने शतकी खेळी केली.

त्याने नेहरु स्टेडियमवर 28 नोव्हेंबर 2010 रोजी न्यूझीलंडविरुद्ध 105 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 21 ऑक्टोबर 2018 रोजी बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 140 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर आता त्याने मंगळावारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यातही शतक केले आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून विराटसाठी गुवाहाटी भाग्यशाली ठरत असल्याचे सिद्ध होत आहे.

विराटने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकटमधील 73 वे शतक करताना वनडे क्रिकेटमध्ये 12500 धावांचा टप्पाही पार केला. तो हा टप्पा पार करणारा भारताचा सचिन तेंडुलकर नंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याने 266 वनडेत 57.72 च्या सरासरीने 12584 धावा केल्या आहेत.

त्याच्याशिवाय मंगळवारी भारताकडून रोहित शर्माने 83 धावांची खेळी केली, तसेच शुभमन गिलने 70 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 373 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून रजिताने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT