KS Bharat and Wriddhiman Saha Dainik Gomantak
क्रीडा

Wriddhiman Saha Video: साहाने का घातली उलटी ट्राऊझर? स्वत:च खुलासा करत म्हणाला, 'मी तेव्हा...'

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध विकेटकिपिंग करण्यासाठी मैदानात उतरताना साहाने ट्राऊझर उलटी घातली होती, ज्याची मोठ्या प्रामाणात चर्चा झाली.

Pranali Kodre

Wriddhiman Saha Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 56 धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने महत्त्वाचा वाटा उचलला होता. पण या सामन्यात त्याच्याबाबतीत एक गमतीशीर घटना घडली.

साहा या सामन्यात यष्टीरक्षणासाठी उतरताना उलटी ट्राऊझर घालून आला होता. त्याने उलटी ट्राऊझर घातल्याने मैदानातील खेळाडूही त्याला हसत होते. तसेच त्याच्या उलट्या ट्राऊझरची सोशल मीडियावरही चर्चा झाली. पण त्याने उलटी ट्राऊझर का घातली होती, याबद्दल कारण स्पष्ट केले आहे.

आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये साहाने त्याने उलटी ट्राऊझर का घातली याबद्दल सांगितले आहे.

साहाने या सामन्यात 43 चेंडूत 81 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शुभमन गिलबरोबर 142 धावांची सलामी भागीदारी केली. गिलनेही नाबाद 94 धावा केल्या. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 227 धावा केल्या होत्या.

त्यानंतर ज्यावेळी लखनऊ सुपर जायंट्स फलंदाजीसाठी उतरले, त्यावेळी गिलच्या ऐवजी गुजरातने अल्झारी जोसेफला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले. तसेच साहाऐवजी बदली यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला खेळवण्याचा गुजरात विचार करत होते. मात्र, पंचांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे साहाला घाईत सर्व तयारी करून मैदानात यावे लागले. पण येताना तो त्याची ट्राऊझर उलटी घालून आला. पण साहाने नंतर वेळ नसल्याने तसाच खेळ पुढे जाऊ दिला.

पण साहाला यष्टीरक्षण करताना वेदना होत असल्याने अखेर बदली यष्टीरक्षक म्हणून दोन षटकांनंतर भरत मैदानात आला आणि त्याने नंतर 18 षटके यष्टीरक्षण केले.

याबद्दल साहाने भरतशी सामना संपल्यानंतर चर्चा केली. या चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आयपीएलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केएस भरत म्हणतो की साहाच्या जागेवर पहिल्यांदा तो यष्टीरक्षण करण्यासाठी तयार झालेला, पण पंचांनी परवानगी दिली नाही.

त्यावेळी साहा सांगतो की तो जेवत होता कारण त्याला छोटी दुखापत झाल्याने गोळ्या घ्यायच्या होत्या. त्याचबरोबर त्याची निडलिंगही होत होती. पण त्याला मैदानात उतरावे लागल्याने घाईत सर्व आवरावे लागले. त्याचमुळे त्याने उलटी ट्राऊझर घातली. यावेळी साहा आणि भरत दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत.

दरम्यान, या सामन्यात गुजरातने दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने 70 धावांची खेळी केली. तसेच काईल मेयर्सने 48 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, नूर अहमद आणि राशीद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT