Matthew Wade ANI
क्रीडा

मॅथ्यूचा फिरला माथा! अन् मॅच रेफरीने गुजरात टायटन्सच्या विकेटकिपरला फटकारले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते.

दैनिक गोमन्तक

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांचा सामना काल वानखेडे स्टेडियम वर पार पडला. गुजरात टायटन्सचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) बाद झाल्यानंतर त्याला राग अनावर झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. पण या सामन्यात एक मोठी घटना घडली. डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेड सहाव्या षटकात 13 चेंडूत 16 धावा करून ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. (Matthew Wade Video)

त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला होता. बाहेर पडल्यानंतर त्याने डीआरएसचा सहारा घेतला. पण चेंडू बॅटला लागला नसल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. पण चेंडू बॅटला लागला असावा, हे त्याच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होत होते. या प्रकरणी गुजरात टायटन्सच्या मॅथ्यू वेडला इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान मॅथ्यूने आयपीएलच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे त्याने कबूल केले आहे. मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे, असे आयपीएल मीडिया अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मासोबतही असे घडले होते. त्यानंतर मॅथ्यू निराश होऊन परतला. मात्र ड्रेसिंग रुममध्ये पोहोचताच तो आक्रमक झाला. त्याने हेल्मेट फेकले. एवढेच नाही तर सहकारी खेळाडूंसमोर त्याने अनेकवेळा बॅट जमिनीवर आपटली. मॅथ्यू वेडचा ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मॅच रेफरीने गुजरात टायटन्सच्या क्रिकेटपटूला या कृत्याबाबात फटकारण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघानेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना आठ विकेट्सने गमावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT