Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: गुजरात टायटन्सने संपवली प्रतिक्षा, संघाने लॉन्च केला लोगो

आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये या वर्षी दोन नवीन संघ दिसणार आहेत. यापैकी एक संघ लखनौ सुपरजायंट्स आणि दुसरा संघ गुजरात टायटन्स आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL-2022) मध्ये या वर्षी दोन नवीन संघ दिसणार आहेत. यापैकी एक संघ लखनौ सुपरजायंट्स आणि दुसरा संघ गुजरात टायटन्स आहे. लखनऊने आपले नाव आणि लोगो याआधीच लॉन्च केला आहे. त्यातच आता गुजरातच्या संघाने (Gujarat Titans) शनिवारी आपल्या टीमचा लोगो लॉन्च केला आहे. फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya), प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) डिजिटल अवतारात दिसत आहेत. (Gujarat Titans Team logo Has Been launched)

दरम्यान, या व्हिडिओमध्ये हे तिघे त्यांच्या डिजिटल अवतारात टीमच्या लोगो आणि मोटोबद्दल बोलत आहेत. शेवटी तिघेही संघाचा उद्देश सांगतात. त्यामध्ये म्हणतात की, 'वी स्टॉप एट नथिंग.' यानंतर टीमचा लोगो येतो.

गुजरात टायटन्समधील अष्टपैलू खेळाडू

IPL-2022 मेगा लिलावामध्ये गुजरातने अनेक अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात घेतले आहे. संघाचा कर्णधार पांड्या स्वतः अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याशिवाय राहुल तेवतिया, जयंत यादव, विजय शंकर असे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. नेहराने काही दिवसांपूर्वी संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या निवडीबद्दल सांगितले होते, “ही एक नवीन फ्रँचायझी आहे. जेव्हा तुम्ही T20 फॉरमॅटबद्दल बोलता, तेव्हा तुम्हाला अष्टपैलू खेळाडूची गरज असते आणि आम्ही तेच केले आहे.

असा आहे गुजरातचा संघ

  • हार्दिक पांड्या - 15 कोटी रुपये

  • राशिद खान - 15 कोटी रु

  • शुभमन गिल - 8 कोटी रु

  • मोहम्मद शमी - 6.15 कोटी रु

  • जेसन रॉय - 2 कोटी रु

  • लॉकी फर्ग्युसन – 10 कोटी रुपये

  • राहुल तेओटिया - 9 कोटी रु

  • नूर अहमद – 30 लाख रुपये

  • आर साई किशोर - 3 कोटी रु

  • अभिनव मनोहर - 2.6 कोटी रु

  • डॉमिनिक ड्रॅक्स - रु. 1.10 कोटी

  • जयंत यादव – 1.70 कोटी रु

  • विजय शंकर – 1.40 कोटी रु

  • दर्शन नळकांडे – 20 लाख रुपये

  • यश दयाल - 3.20 कोटी रु

  • अल्झारी जोसेफ – 2.40 कोटी रुपये

  • प्रदीप सांगवान – 20 लाख रुपये

  • वृद्धीमान साहा - 1.90 कोटी रु

  • मॅथ्यू वेड - 2.40 कोटी रु

  • गुरकीरत सिंग - 50 लाख रुपये

  • वरुण आरोन - 50 लाख

  • हार्दिक पांड्या - 15 कोटी रुपये

  • राशिद खान - 15 कोटी रु

  • शुभमन गिल - 8 कोटी रु

  • मोहम्मद शमी - 6.15 कोटी रु

  • जेसन रॉय - २ कोटी रु

  • लॉकी फर्ग्युसन – 10 कोटी रुपये

  • राहुल तेओटिया - 9 कोटी रु

  • नूर अहमद – 30 लाख रुपये

  • आर साई किशोर - 3 कोटी रु

  • अभिनव मनोहर - 2.6 कोटी रु

  • डॉमिनिक ड्रॅक्स - रु. 1.10 कोटी

  • जयंत यादव – 1.40 कोटी रु

  • विजय शंकर – 1.40 कोटी रु

  • दर्शन नळकांडे – 20 लाख रुपये

  • यश दयाल - 3.20 कोटी रु

  • अल्झारी जोसेफ – 2.40 कोटी रुपये

  • प्रदीप सांगवान – 20 लाख रुपये

  • वृद्धीमान साहा - 1.90 कोटी रु

  • मॅथ्यू वेड - 2.40 कोटी रु

  • गुरकीरत सिंग - 50 लाख रुपये

  • वरुण आरोन - 50 लाख रु

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT